लढाई अंतिम फेरीसाठी

आज सामना; हैदराबाद - चेन्नई वानखेडे स्टेडियमवर भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:31 AM2018-05-22T00:31:13+5:302018-05-22T00:31:13+5:30

whatsapp join usJoin us
For the final round of the battle | लढाई अंतिम फेरीसाठी

लढाई अंतिम फेरीसाठी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


मुंबई : कॅप्टन कूल धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स आणि साखळी फेरीत अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान आज, मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगचा पहिला क्वालिफायर रंगणार आहे. उभय संघ अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी खेळणार असल्यामुळे या लढतीत चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल.
साखळी फेरीत उभय संघांनी प्रत्येकी १८ गुणांची कमाई केली, पण नेटरनरेटच्या आधारावर हैदराबाद संघाने अव्वल स्थान पटकावले.
वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या लढतीतील विजेता संघ थेट २७ मे रोजी खेळल्या जाणाºया अंतिम लढतीसाठी पात्र ठरेल. अंतिम लढत याच मैदानावर होणार आहे. पराभूत होणाºया संघाला कोलकातामध्ये २५ मे रोजी दुसरा क्वालिफायर खेळावा लागेल.
मंगळवारच्या लढतीत सुपरकिंग्सचे पारडे जड भासत आहे. त्यांनी साखळी फेरीत दोन्ही सामन्यात सनरायझर्सचा पराभव केला होता आणि गेल्या लढतीतही विजय मिळवला आहे. चेन्नई सुपरकिंग्सने रविवारी रात्री पुणे येथे किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव केला. दुसºया बाजूचा विचार करता सनरायझर्सला सलग तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.
चेन्नईने सनरायझर्सची सलग सहा विजयांची मालिका खंडित करताना १३ मे रोजी पुणे येथे ८ गडी राखून विजय मिळवला होता. फलंदाजीमध्ये सनरायझर्सची भिस्त पूर्णपणे कर्णधार केन विलियम्सनवर अवलंबून आहे. दुसºया क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ६६१ धावा फटकावल्या आहेत. शिखर धवन (४३७) व विलियम्सन यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मधल्या फळीतील मनीष पांडेला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये वेगवान त्रिकुट भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांनी चांगली कामगिरी केली आहे तर फिरकीपटू राशिद खान व शाकिब अल-हसन प्रभावी ठरले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाचे गोलंदाज शानदार फॉर्मात आहेत, पण त्यांच्यापुढे सध्या तुफानी कामगिरी करत असलेल्या अंबाती रायुडूला रोखण्याचे आव्हान राहील. उभय संघांदरम्यान यापूर्वी खेळल्या गेलेल्या लढतीत रायुडूने शतकी खेळी केली होती, तर पहिल्या लढतीत नाबाद ७९ धावा फटकावल्या होत्या. (वृत्तसंस्था)

चेन्नई संघ मोजक्या फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून नाही. रायुडू (५८६) याच्याव्यतिरिक्त शेन वॉटसनही (४३८) शानदार फॉर्मात आहे. कर्णधार धोनी अनेक लढतींमध्ये फिनिशर ठरला आहे तर सुरेश रैनाने रविवारी सूत्रधाराची भूमिका बजावली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एंगिडीने रविवारी १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि ड्वेन ब्राव्हो यांची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून फिरकीची जबाबदारी हरभजन सिंग व रवींद्र जडेजा यांच्याकडे राहील.
प्लेआॅफ लढती ७ वाजता प्रारंभ होईल. त्यापूर्वी महिलांचा एक प्रदर्शनी सामना होणार आहे. हा सामना महिलांच्या प्रस्तावित लीगच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. त्याचबरोबर मोठ्या संख्येने उपस्थित राहणाºया प्रेक्षकांपुढे खेळण्याची संधी मिळणार असल्याने महिला खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सनरायझर्स हैदराबाद : केन विलियम्सन (कर्णधार), बिपुल शर्मा, राशिद खान, शाकिब अल हसन, रिद्धिमान साहा, रिकी भुई, ख्रिस जॉर्डन, खलील अहमद, दीपक हुडा, संदीप शर्मा, सचिन बेबी, श्रीवत्स गोस्वामी, युसुफ पठाण, कार्लोस ब्रेथवेट, मेहदी हसन, शिखर धवन, मोहम्मद नाबी, बसिल थम्पी, बिली स्टेनलेक, भुवनेश्वर कुमार, नटराजन, मनिष पांडे, सिद्धार्थ कौल, तन्मय अग्रवाल आणि अ‍ॅलेक्स हेल्स.

चेन्नई सुपरकिंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केएम आसिफ, सॅम बिलिंग्ज, चैतन्य बिष्णोइ, द्वेन ब्रावो, दीपक चहर, फाफ डू प्लेसिस, हरभजन सिंग, इम्रान ताहिर, रविंद्र जडेजा, केदार जाधव, नारायण जगदीशन, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, लुंगी एनगिडी, सुरेश रैना, अंबाती रायडू, मिचेल सँटनर, कनिष्क सेठ, कर्ण शर्मा, ध्रुव शोरे, शार्दुल ठाकूर, मुरली विजय, शेन वॉटसन, डेव्हिड विली आणि मार्क वूड.

Web Title: For the final round of the battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.