बंगळुरु : चांगल्या सुरुवातीनंतर विजयी मार्गावर असूनही मोक्याच्यावेळी बळी गमावल्याने यजमान टीम इंडियाला चौथ्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध २१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. आॅस्ट्रेलियायाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३३४ धावा उभारल्यानंतर भारताची ५० षटकात ८ बाद ३१३ धावा अशी मर्यादित मजल राहिली. यासह आॅस्ट्रेलियायाने आपली पराभवाची मालिका खंडित करतानाच भारताच्या सलग ९ सामन्यांतील विजयी घोडदौडही रोखली.एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांनी भारताला शतकी सलामी दिली. मात्र, हे दोघेही बाद झाल्यानंतर आॅसीने भारताला ठराविक अंतराने धक्के दिले. रहाणेने ६६ चेंडूत ६ चौकार व एका चौकारासह ५३ धावा केल्या, तर रोहितने ५५ चेंडूत ६५ धावा करताना केवळ एक चौकार मारताना ५ षटकार खेचले. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली (२१) फारशी चमक न दाखवता बाद झाला. यावेळी आॅस्टेÑलियाने पुनरागमन केले.केदार जाधवने अष्टपैलू हार्दिक पांड्यासह चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची आक्रमक भागीदारी केली. अॅडम झम्पाने हार्दिकला बाद करुन ही जोडी फोडली. हार्दिकने ४० चेंडूत एक चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. यानंतर केदारने मनिष पांड्येसह सर्व सूत्रे आपल्याकडे घेत भारताची धावगती कमी होऊ दिली नाही. दोघांनी ६१ धावांची निर्णायक भागीदारी केली. परंतु, रिचर्डसनने केदराचा बहुमुल्य बळी घेत सामना आॅस्टेÑलियाच्या बाजूने झुकवला. त्याने ६९ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ६७ धावांचा तडाखा दिला. पाठोपाठ मनिषही (३३) परतला. यानंतर महेंद्रसिंग धोनीही अडखळला. त्याने एक चौकार व एक षटकार खेचला खरा, परंतु मोक्याच्यावेळी सलग निर्धाव चेंडू खेळल्यानंतर आक्रमणाच्या प्रयत्नात तो बाद झाला आणि भारताच्या आशा संपुष्टात आल्या. रिचडर््सनने ३ बळी घेतले.तत्पूृवी, डेव्हिड वॉर्नरने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर आॅस्टेÑलियाने मजबूत मजल मारली. अॅरोन फिंचने पुन्हा शानदार खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले. या दोघांनी २३१ धावांची जबरदस्त सलामी देत आॅस्टेÑलियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. उमेश यादवने ७१ धावांत ४ बळी घेत एकदिवसीय क्रिकेटमधील बळींचे शतक पूर्ण केले.नाणेफेक जिंकून आॅसी कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कारकिर्दीतील शंभरावा एकदिवसीय सामना खेळताना वॉर्नरने ११९ चेंडूत १२ चौकार व ४ षटकारांसह १२४ धावांचा चोप दिला. फिंचने ९६ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ९४ धावा केल्या. वॉर्नर - फिंच जोडीपुढे सर्वच गोलंदाज अपयशी ठरत असल्याचे दिसल्यावर कर्णधार विराट कोहलीने बदली गोलंदाज केदार जाधवकडे चेंडू दिला. त्याने ३५व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून देताना शतकवीर वॉर्नरचा बहुमुल्य बळी घेतला. पुढच्याच षटकात स्थिरावलेला फिंच उमेश यादवचा शिकार ठरला. दोन्ही सलामीवीर परतल्यानंतर उमेशने आपल्या पुढच्याच षटकात स्मिथला (३) बाद केले. तीन प्रमुख फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने आॅसी धावगतीला ब्रेक लागला.यानंतर, ट्राविस हेड - पीटर हँड्सकॉम्ब यांनी ६३ धावांची भागीदारी केली. उमेशने पुन्हा एकदा महत्त्वाची कामगिरी करुन प्रथम हेडला आणि नंतर हँड्सकॉम्बला बाद करुन आॅसीची चारशेच्या दिशेनेसुरु असलेली कूच रोखली. हेडने३८ चेंडूत २९ धावा, तर हँड्सकॉम्बने ३० चेंडूत ४३ धावांची आक्रमक खेळी केली. (वृत्तसंस्था)धावफलकआॅस्टेÑलिया : अॅरोन फिंच झे. हार्दिक गो. उमेश ९४, डेव्हीड वॉर्नर झे. अक्षर गो. केदार १२४, ट्राविस हेड झे. रहाणे गो. उमेश २९, स्टीव्ह स्मिथ झे. कोहली गो. उमेश ३, पीटर हँड्सकॉम्ब त्रि. गो. उमेश ४३, मार्कस स्टोइनिस नाबाद १५, मॅथ्यू वेड नाबाद ३. अवांतर - २३. एकूण : ५० षटकात ५ बाद ३३४ धावा.गोलंदाजी : मोहम्मद शमी १०-१-६२-०; उमेश यादव १०-०-७१-४; अक्षर पटेल १०-०-६६-०; हार्दिक पांड्या ५-०-३२-०; युझवेंद्र चहल ८-०-५४-०; केदार जाधव ७-०-३८-१.भारत : रहाणे झे. फिंच गो. रिचडर््सन ५३, रोहित धावबाद (स्मिथ) ६५, कोहली त्रि. गो. नॅथन २१, हार्दिकझे. वॉर्नर गो. झम्पा ४१, केदार झे. फिंच गो. रिचडर््सन ६७, पांड्ये त्रि. गो. कमिन्स ३३, धोनी त्रि. गो. रिचडर््सन १३, अक्षर झे. मॅक्सवेल गो. नॅथन ५, शमी नाबाद ६, उमेश नाबाद २. गोलंदाजी : कमिन्स १०-०-५९-१; कुल्टर - नाइल १०-०-५६-२; रिचडर््सन १०-०-५८-३; स्टोइनिस ४.५-०-३४-०; अॅरोन फिंच ०.१-०-१-०; झम्पा ९-०-६३-१; हेड ६-०-३८-०.शंभराव्या सामन्यातील ‘शतकवीर’१. गार्डन ग्रीनीज (वेस्ट इंडिज)२. ख्रिस केर्न्स (न्यूझीलंड)३. यूसुफ योहाना (पाकिस्तान)४. कुमार संगाकारा (श्रीलंका)५. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)६. मार्क टेÑस्कोथिक (इंग्लंड)७. रामनरेश सारवान (वेस्ट इंडिज)८. डेव्हीड वॉर्नर (आॅस्टेÑलिया)शंभराव्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणार वॉर्नर पहिला आॅसी, तर जगातील आठवा फलंदाज ठरला. वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधील १४वे शतक झळकावले.महत्त्वाचे...उमेश यादवने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले.५ सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ अशी आघाडी घेतली असून मालिकेतील अखेरचा सामना रविवारी नागपूर येथे खेळविला जाईल.डेथ ओव्हर्समध्ये आॅसीने केलेला टिच्चून मारा निर्णायक ठरला.फिंच - वॉर्नर यांनी आॅस्टेÑलियाकडून विक्रमी २३१ धावांची आक्रमक सलामी दिली.याआधी हा विक्रम ज्योफ मार्श - डेव्हीड बून यांच्या नावावर होता. त्यांनी १९८६ साली भारताविरुध्द २१२ धावांची सलामी दिली होती.विद्यमान आॅसी संघात कर्णधार स्टीव्ह स्मिथ सर्वाधिक १०२ सामने खेळला आहे. त्यानंतर वॉर्नरचा क्रमांक आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अखेर आॅसी जिंकले! भारताचा निसटता पराभव, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केदार जाधव यांची झुंज व्यर्थ
अखेर आॅसी जिंकले! भारताचा निसटता पराभव, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केदार जाधव यांची झुंज व्यर्थ
चांगल्या सुरुवातीनंतर विजयी मार्गावर असूनही मोक्याच्यावेळी बळी गमावल्याने यजमान टीम इंडियाला चौथ्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध २१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 3:06 AM