मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धचा क्रिकेट सामना आयोजनावरुन इंदूरच्या होळकर स्टेडियमविषयी वाद उद्भवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट संघटनेवर (एमसीए) एकदिवसीय सामना आयोजनाबाबत पूर्ण विश्वास आहे. परंतु, २९ आॅक्टोबरला होणारा विंडीजविरुद्धचा सामना आयोजित करण्यासाठी आर्थिक अडचणी येत असल्याचे कारण एमसीएने दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा भारत - विंडीज मालिका सामना अयोजनाचा प्रश्न पुढे आला आहे.यासंबधी एमसीएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या अधिकाºयांसह भेट घेऊन त्यांना सामना आयोजनामध्ये येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. हा सामना आयोजित करण्यासाठी केवळ आर्थिक अडचण नसून जाहिराती अधिकाºयांसाठी निविदा सूचनाही काढण्यात आले नाही. एमसीएचे बँक खाते सील केले असल्याने संघटनेला यासाठी कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नसल्याचे एमसीए अधिकाºयांनी सांगितले.एमसीएच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाच्या आग्रहामुळे एमसीएच्या वरिष्ठ अधिकारी व व्यवस्थापक समितीच्या काही सदस्यांनी बीसीसीआय अधिकाºयांसह भेट घेतली. यावेळी बँक खाते हातळण्यात येत असलेली अडचण व निविदा जारी करण्याबाबतच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. आम्ही २९ आॅक्टोबरला होणाºया सामन्यासाठी अजून स्टेडियममध्ये जाहीरात, साफ सफाई, खाजगी सुरक्षा अशांसाठी निविदा दिलेल्या नाहीत.’बीसीसीआय सीओए प्रमुख विनोद राय म्हणाले की, ‘मुंबईतील आयोजित सामन अन्य स्थळी हलविण्यात येईल, असे म्हणणार नाही. पण काही अडचणी आल्या असून यावर नक्कीच उपाय काढण्यात यश येईल, असा मला विश्वास आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सामना आयोजित करण्यात आर्थिक अडचण; ‘एमसीए’ने मांडली आपली बाजू
सामना आयोजित करण्यात आर्थिक अडचण; ‘एमसीए’ने मांडली आपली बाजू
वेस्ट इंडिजविरुद्धचा क्रिकेट सामना आयोजनावरुन इंदूरच्या होळकर स्टेडियमविषयी वाद उद्भवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट संघटनेवर (एमसीए) एकदिवसीय सामना आयोजनाबाबत पूर्ण विश्वास आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 5:43 AM