FIR lodged against Ex Indian U-19 captain Vijay zol : २०१२च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आणि २०१४च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचा कर्णधार विजय झोल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. cryptocurrency व्यवहारातून धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय झोल हा शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा जावई आहेत. उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने विजय झोलविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे जालन्यातील घनसांवगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय झोल कडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
विजय झोल यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य लक्षणीयरीत्या घसरले आहे. उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने तक्रारीत आरोप केला आहे, की विजयने नुकसानीसाठी त्यांना जबाबदार धरले आणि रागाने त्यांना धमकावले. विजय आणि त्याच्या भावाने त्याला घाबरवण्यासाठी त्याच्या घरी गुंड पाठवले. या गुंडगिरीनंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही खरात दाम्पत्याने तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विजय, त्याचा भाऊ आणि अन्य १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी खरात यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात दाम्पत्याने क्रिप्टोकरन्सीचे आमिष दाखवून सुमारे १२ लाख रुपयांची फसवणूक केली. खरात पती-पत्नीने आम्हाला क्रिप्टोकरन्सीद्वारे अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवले आणि साडेबारा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विजयने १५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७३३ धावा केल्या आहेत, त्यात दोन शतकं व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. १९ लिस्ट ए व २५ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे ५४६ व ५५१ धावा आहेत.