भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( FIR registered against Yuvraj Singh) याच्या विरोधात हरयाणा येथे FIR दाखल करण्यात आले आहे. २०२०च्या इंस्टाग्राम लाईव्ह सत्रात वर्ल्ड कप विजेत्या युवीनं 'जातीवाचक टिप्पणी' केली होती. त्याची ही टिप्पणी दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला आणि त्याबाबत नंतर युवीनं माफीही मागितली होती. आर अश्विन 'जगात भारी'; भारतीय गोलंदाजाच्या नावावर ऐतिहासिक विक्रम
हरयाणामधील हिसार येथील वकिलांनी ८ महिन्यांपूर्वी पोलिस स्थानकात युवीविरोधात तक्रार दाखल केली होती. इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार ८ महिन्यांनंतर हरयाणा पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केला आहे. हिसार क्षेत्रात येणाऱ्या हन्सी पोलिस स्थानकात युवीविरोधात IPC कलम (Sections) 153, 153A, 295, 505, उपकलम 3 (1) (r) and 3 (1) (s) of the SC/ST Act नुसार FIR दाखल झाला आहे. Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!
युवीनं काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) इंस्टाग्रामवर चॅट करताना युजवेंद्र चहलबद्दल ( Yuzvendra Chahal) आक्षेपार्ह विधान केलं होतं. दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला 'भंगी' असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. ''ये भं**** लोगो को काम नही है, ये युझी और इसको ( कुलदीप)'' असे युवी रोहितला म्हणाला होता. पिवळं जॅकेट, डोळ्यावर गॉगल; चेन्नई कसोटीत सर्वांचे लक्ष वेधणारी 'ती' कोण?
युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंड बुधवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर युवीनं माफी मागितली होती. युवीनं 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं 304 वन डे, 40 कसोटी आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. युवीनं ट्विट केलं की,''माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचं कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो.''
Web Title: FIR registered against former cricketer Yuvraj Singh over 'casteist remark' during Insta live chat from 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.