राजस्थानमध्ये सध्या सत्तासंघर्ष सुरू आहे. राजस्थानमध्ये बंडखोरी करणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी नाराजीचं बंड पुकारलं, त्यानंतर काँग्रेसने भाजपावर आरोप करत सरकार अस्थिर करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत असल्याचा आरोप केला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर सचिन पायलट या आणखी युवा नेत्यानं काँग्रेसला रामराम केला. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा, अशी चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील केल्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं. त्यानंतर सचिन पायलट यांच्या राजीनाम्यानंतर राजस्थानमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यानंतर कोणाचा नंबर असा सवाल करण्यात आला. त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं Raahul G? असं ट्विट केलं आणि ते ट्विट आता व्हायरल होत आहे.
Web Title: First, Jyotiraditya Scindia, Now, Sachin Pilot. Who next? Aakash Chopra say Rahul G?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.