कोलकाता : भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.बांगलादेशने रविवारी ६ बाद १५२ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी ८९ धावांची गरज होती. भारताने ५० मिनिटांपेक्षा कमी वेळेत विजयाची औपचारीकता पूर्ण केली. विशेष म्हणजे, सलग चौथ्यांदा डावाने विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरला.मुशफिकूर रहीमचा (७४) अपवाद वगळता बांगलादेशचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. बांगलादेशचा दुसरा डाव ४१.१ षटकात १९५ धावात संपुष्टात आला. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावात आटोपला होता. या मालिकेत सलग दुसरी लढत ३ दिवसात संपली. २-० असा शानदार विजय मिळवताना भारताने १२० गुणांची कमाई करीत जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत अघाडी कायम राखली.मुशफिकूरने वैयक्तिक ५९ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्याने आक्रमक पवित्रा घेताना ईशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. उमेश यादवने मुशफिकूरला माघारी परतवले. त्याचा फसलेला फटका जडेजाच्या हातात विसावला. त्याने १६ चौकार लगावले. महमुदुल्लाह (३९) रिटायर्ड हर्ट झाला होता. तो फलंदाजीसाठी आला नाही. यादवने त्यानंतर अल अमीन हुसेनला यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडत भारताचा विजय निश्चित केला. यादवने दुसऱ्या डावात ५३ धावांत ५ बळी घेतले. त्याने या लढतीत ८१ धावांत ८ बळी घेतले. शमीने पहिल्या डावात ३६ धावांत २ बळी घेतले होते, पण दुसºया डावातही त्याने आपल्या तिखट माºयाच्या जोºयावर पाहुण्या संघावर वर्चस्व कायम राखले. ईशांतने या लढतीत ७८ धावांत ९ बळी (दुसºया डावात ५६ धावात ४) घेतले. (वृत्तसंस्था)सामन्यातील धावफलकबांगलादेश (पहिला डाव) : ३०.३ षटकात सर्वबाद १०६ धावा.भारत (पहिला डाव) : ८९.४ षटकात ९ बाद ३४७ (डाव घोषित).बांगलादेश (दुसरा डाव) : शादमान इस्लाम पायचित गो. ईशांत ०, इमरुल कायसे झे. कोहली गो. ईशांत ५, मोमिनुल हक झे. साहा गो. ईशांत ०, मोहम्मद मिथुन झे. शमी गो. यादव ६, मुशफिकूर रहीम झे. जडेजा गो. यादव ७४, महमुदुल्लाह रिटायर्ड हर्ट ३९, मेहदी हसन मिरास झे. कोहली गो. ईशांत १५, ताईजुल इस्लाम झे. रहाणे गो. यादव ११, इबादत हुसेन झे. कोहली गो. यादव ०, अल अमीन हुसेन झे. साहा गो. यादव २१, अबू जायेद नाबाद २. अवांतर (२२). एकूण ४१.१ षटकांत सर्वबाद १९५ धावा. बाद क्रम : १-०, २-२, ३-९, ४-१३, ५-१३३, ६-१५२, ७-१५२, ८-१८४, ९-१९५.गोलंदाजी : ईशांत शर्मा १३-२-५६-४,उमेश यादव १४.१-१-५३-५, मोहम्मद शमी ८-०-४२-०, रविचंद्रन अश्विन ५-०-१९-०, रवींद्र जडेजा १-०-८-०.गुलाबी चेंडूच्या या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी ईडन गार्डन्स शानदार यजमान ठरले. तिन्ही दिवस स्टेडियम खचाखच भरले होते. सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयने या लढतीला संस्मरणीय ठरविण्यासाठी सर्वकाही केले आणि त्यात ते यशस्वीही ठरले.एसजी गुलाबी चेंडूचा प्रतिष्ठेच्या लढतीत उपयोग करण्यासाठी स्पर्धात्मक सामन्यात उपयोग करण्यात आला नव्हता आणि अपेक्षेनुरुप त्यात भारताचा वेगवान मारा यशस्वी ठरला. त्यांनी सर्व बळी घेतले.बांगलादेशच्या चार फलंदाजांच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. त्यामुळे त्यांना दोन पर्यायी खेळाडूंना पाचारण करावे लागले. हेल्मेटवर वारंवार चेंडू आदळल्याने गुलाबी चेंडूच्या दृष्यतेवर प्रश्न उपस्थित झाले.ही लढत विराट कोहलीच्या २७ व्या कसोटी शतकासाठीही लक्षात राहील. त्याची आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे. या सामन्यात केवळ ९६८ चेंडू टाकले गेल्यामुळे भारतात निकाली ठरलेला हा सर्वांत छोटा सामना ठरला. भारताने मायदेशात व विदेशात सलग सातवा कसोटी विजय मिळवला. चेंडूंचा विचार करता भारताने यापूर्वी २०१८ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सर्वांत जलद विजय मिळवला होता. त्यात १०२८ चेंडू टाकले होते व अफगाणचा १ डाव २६२ धावांनी पराभव केला होता.महत्त्वाचेभारताने सलग चार सामन्यांत डावाने विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला. असा पराक्रम करणारा भारत पहिला देश.भारताने सलग ७ कसोटी सामने जिंकले. याआधी २०१३ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सलग ६ सामने जिंकले होते.दुसºया कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी १९ बळी घेतले. घरच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.मागील दोन वर्षांत तिसऱ्यांदा भारतीय वेगवान गोलंदाजांनी १९ किंवा त्याहून अधिक बळी घेतले.ईडनवर फिरकीपटूंना एकही बळी घेता आला नाही. घरच्या मैदानावर सर्व बळी वेगवान गोलंदाजांनी घेण्याची ही पहिलीच वेळ.एकाच कसोटी सामन्यात भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांनी पहिल्यांदाच ८ किंवा त्याहून अधिक बळी घेतले. २०१०-११ साली पर्थ येथे अॅशेस मालिकेत आॅस्टेÑलियाच्या रायन हॅरिस-मिचेल जॉन्शन यांनी अशी कामगिरी केली होती.क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांमध्ये कोहलीने आॅस्टेÑलियाचे दिग्गज अॅलन बॉर्डर यांना मागे टाकत पाचवे स्थान मिळवले.सर्वाधिक कसोटी विजय मिळवलेले कर्णधारग्रॅमी स्मिथ (द. आफ्रिका) : ५३ सामनेरिकी पाँटिंग (आॅस्टेÑलिया) : ४८ सामनेस्टीव्ह वॉ (आॅस्टेÑलिया) : ४१ सामनेक्लाइव्ह लॉइड (वेस्ट इंडिज) : ३६ सामनेविराट कोहली (भारत) : ३३ सामनेअॅलन बॉर्डर (आॅस्टेÑलिया) : ३२ सामनेभारताने सलग एक डाव राखून मिळवलेले कसोटी विजयवि.वि. द. आफ्रिका, एक डाव आणि १३७ धावांनी, पुणे.वि.वि. द. आफ्रिका, एक डाव आणि २०२ धावांनी, रांची.वि.वि. बांगलादेश, एक डाव आणि १३० धावांनी, इंदूर.वि.वि. बांगलादेश, एक डाव आणि ४६ धावांनी, कोलकाता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पहिला ‘गुलाबी’ विजय : भारताचा मायदेशात सलग १२ वा मालिका विजय
पहिला ‘गुलाबी’ विजय : भारताचा मायदेशात सलग १२ वा मालिका विजय
भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 5:30 AM