Join us  

पहिल्या कसोटीपूर्वीच द. आफ्रिकेनं केला भारताचा अपमान, तुम्हालाही येईल राग

तीन कसोटी सामन्याच्या मालिकेला उद्यापासून केपटाऊन येथून सुरुवात होत आहे. उद्या सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीसामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेकडून मोठी चूक झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 5:01 PM

Open in App

केपटाऊन - तीन कसोटी सामन्याच्या मालिकेला उद्यापासून केपटाऊन येथून सुरुवात होत आहे. उद्या सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीसामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेकडून मोठी चूक झाली आहे.  त्यामुळं भारताचा अपमान झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहेत. 

न्यूलँड्स मैदानावर काल उल्टा तिरंगा फडकवण्यात आला. जवळजवळ दोन तास उलटा तिरंगा  फडकला. पण एकाही भारतीय संघातील खेळाडू अथवा संघ व्यवस्थापकाचं याकडे लक्ष गेलं नाही. ज्यावेळी तेथील स्थानिक पत्रकराला हे समले. त्यावेळी त्यानं ही बाब तात्काळ संघ व्यवस्थापकास सांगितलं. त्यानंतर ही मोठी चूक संघ व्यवस्थापकाच्या लक्षात आली. 

त्या संघ व्यवस्थापकानं दक्षिण आफ्रिकाच्या व्यवस्थापकास ही बाब सांगितली. त्यानंतर लगेच भारतीय तिरंगा सरळ फडकवण्यात आला. ज्या व्यक्तीला झेंडा मैदानात झेंडा लावण्याचं काम दिलं होतं. त्याला भारतीय झेंडा कसा फडकवतात हे माहित नव्हते. 

भारताच्या विजयात दुष्काळ ठरणार 'हिरो'

यंदाच्या दक्षिण आफ्रिकादौऱ्यात पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना उसळत्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार नाही असं दिसतंय. सध्या दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश महत्वाच्या शहरांना दुष्काळ आणि पाणी टंचाईने ग्रासलं आहे. या कारणामुळे आफ्रिकेच्या संघाला फायदा होईल अशी खेळपट्टी बनवणं अवघड असल्याचं मैदानातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं या दुष्काळाचा भारतीय संघाला चांगलाच फायदा होणार आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेतील इतिहास बदलण्याची संधी चालून आली आहे. 

केप टाऊनच्या मैदानाचे क्युरेटर इवन फ्लिंट यांनी ESPNcricinfo या वेबसाईटला दिलेल्या माहितीनूसार, पहिल्या कसोटीची खेळपट्टी ही आफ्रिकेच्या संघाला फायदेशीर ठरेल याची खात्री देता येणार नाही. फ्लिंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मैदानातले कर्मचारी पाणीटंचाईमुळे आठवड्यातून केवळ दोन वेळा मैदानावर पाणी मारु शकतायत, त्यामुळे केप टाऊनची खेळपट्टी हिरवीगार आणि स्टेन, मॉर्कल, फिलँडर यासारख्या गोलंदाजांना मदत करेल अशी राहणार नाही. येत्या दोन दिवसांमध्ये सकाळी पावसाची हलकी सर पडून नंतर प्रखर उन पडल्यास आम्ही कदाचीत नेहमीप्रमाणे खेळपट्टी तयार करु. मात्र या सर्व गोष्टी आपल्या हातात नसल्याचंही फ्लिंट यांनी मान्य केलं. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारतीय संघ आफ्रिकेच्या तोफखान्याचा कसा सामना करतो हे पहावं लागणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांना एका दिवसाला 87 लिटरच्या वर पाणी वापरण्यास मनाई केली आहे. केप टाऊनच्या मैदानावर बोअरवेलच्या पाण्याची सोय आहे.  केपटाऊनमधील पाणी समस्या इतकी गंभीर झाली आहे की, पाण्याचा स्तर अत्यंत खालावला आहे. ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. 

स्थानिक निवासी निसियांनी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'पाण्याची कमतरता असताना केपटाऊनमध्ये दोन्ही संघांदरम्यान कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशावेळी इतर गोष्टींशी तुलना करता पाण्याची जास्त चिंता असली पाहिजे. पण खेळासाठी असं करणं कठीण आहे'. तेथीलच अजून एक नागरिक सब्बीर हर्नेकर यांनी लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी लोकांना आपल्यासोबत पाण्याच्या बाटल्या आणि कॅन घेऊन येण्याचा सल्ला दिला आहे. तेथीलच एका दांपत्याने पाण्याची समस्या इतकी मोठी आहे की, लांबून पाणी आणावं लागतं असं सांगितलं आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८