एजबस्टन, बर्मिंघम : कर्णधार विराट कोहलीने ठोकलेल्या नाबाद ११२ धावांच्या शतकी खेळीने भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ बाद २३७ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आपल्या कार्यकिर्दीतील २२ वे शतक केले. सॅम क्युरान आणि बेन स्टोक्स यांच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडिया चांगलीच अडचणीत आला होता. त्याला हार्दिक पांड्याने २२ धावा करुन साथ दिली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या पहिल्या डावातील २८७ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आपल्या कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या सॅम क्युरान याने ३८ धावांत चार बळी घेतले. त्याने भारताचे सलामीवीर मुरली विजय, शिखर धवन यांच्यासह तिसºया स्थानावर आलेल्या लोकेश राहुल यालादेखील बाद केले. पहिल्या तासाभरात भारतीय फलंदाजांनी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना यश मिळू दिले नाही. त्यांनी ७० चेंडूंतच ५० धावांची भागीदारी केली. त्यानंतर रुट याने गोलंदाजीची धुरा क्युरानकडे दिली आणि भारतीय संघ अडचणीत आला. १४व्या षटकांत त्याने मुरली विजयला पायचीत बाद केले. मैदानी पंचांनी बाद दिले नाही तेव्हा इंग्लंडने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यात मुरली विजय बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर क्युरानने राहुलला भोपळाही न फोडता परत पाठवले. लगेचच क्युरानने धवनला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे बिनबाद ५० वरून भारतीय संघ तीन बाद ५९ असा अडचणीत आला.
कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर चिवट झुंज दिली. मात्र त्याला तीन वेळा जीवदान मिळाले. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये जोश बटलर याने त्याचा झेल सोडला. त्या वेळी कोहलीने खातेदेखील उघडले नव्हते. त्यानंतर तो २१ धावांवर असताना पुन्हा स्टोक्स याने रहाणे (१५ धावा) याला बाद केले. त्याच षटकांत दिनेश कार्तिकला बाद करत कसोटीतील आपले १०० बळी पूर्ण केले.
अष्टपैलू खेळाडूू हार्दिक पांड्या याने कर्णधार विराट कोहलीची साथ दिली. त्या दोघांनी ४८ धावांची भागीदारी केली. पांड्याने २२ धावा केल्या. मात्र क्युरानने चहापानाच्या आधी त्याला बाद केले.
विराटची इंग्लंडमधील सर्वाधिक धावसंख्या
इंग्लंडच्या दौºयात भारताचा कर्णधार विराट कोहली किती धावा
करतो, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या शंभराव्या चेंडूवर कोहलीने चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. नंतर त्याने १९१ चेंडूत आपले नाबाद शतकही पूर्ण केले. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांतील कोहलीची सर्वाधिक खेळी ठरली आहे.
कोहलीला इंग्लंडच्या २०१४ साली झालेल्या दौºयातील पाच सामन्यांमध्ये फक्त १३४ धावाच करता आल्या होत्या. गेल्या दौºयात कोहलीने अनुक्रमे ३९, २८, २५, २०, ८, ७, ६, १, 0, 0 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमधील कसोटी सामन्यांत कोहलीचे हे पहिले अर्धशतक ठरले आहे. कोहलीने आपल्या शंभराव्या चेंडूवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला आणि आपले पहिले-वहिले शतक साजरे केले.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव
सर्व बाद २८७ धावा
भारत चहापानापर्यंत ४८ षटकांत ६ बाद १६० धावा, मुरली विजय पायचीत गो. क्युरान २०, शिखर धवन झे. मालन गो. क्युरान २६, लोकेश राहुल गो. क्युरान ४, विराट कोहली नाबाद ५३, अजिंक्य रहाणे झे. जेनिंग्ज गो. स्टोक्स १५, दिनेश कार्तिक गो. स्टोक्स ०, हार्दिक पांड्या पायचीत क्युरान २२, आर. आश्विन नाबाद ६ अवांतर १४. गोलंदाजी - जेम्स अँडरसन ०/२७, स्टुअर्ट ब्रॉड ०/४०, सॅम क्युरान ४/३८, आदिल राशिद ०/५, बेन स्टोक्स २/४०.
Web Title: First test against England: Virat Kohli's record of 100 not out!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.