पहिली कसोटी : धवनचे द्विशतक हुकले, पुजाराचे शतक

सलामीवीर शिखर धवन याने झंझावाती फटकेबाजीचा अप्रतिम नमुना सादर करीत कारकिर्दीत सर्वोच्च (१९० धावा) खेळी केली. १४४ धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पुजारासोबत त्याने दुसºया गड्यासाठी २५३ धावांची भागीदारी करताच भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवसअखेर ३ बाद ३९९ पर्यंत मजल गाठून यजमान लंकेवर वर्चस्व प्रस्थापित केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:45 AM2017-07-27T02:45:36+5:302017-07-28T13:00:51+5:30

whatsapp join usJoin us
First test Against SL, dhawan & pujara made Century | पहिली कसोटी : धवनचे द्विशतक हुकले, पुजाराचे शतक

पहिली कसोटी : धवनचे द्विशतक हुकले, पुजाराचे शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गाले : सलामीवीर शिखर धवन याने झंझावाती फटकेबाजीचा अप्रतिम नमुना सादर करीत कारकिर्दीत सर्वोच्च (१९० धावा) खेळी केली. १४४ धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पुजारासोबत त्याने दुसºया गड्यासाठी २५३ धावांची भागीदारी करताच भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवसअखेर ३ बाद ३९९ पर्यंत मजल गाठून यजमान लंकेवर वर्चस्व प्रस्थापित केले.
धवनला ३१ धावांवर जीवदान मिळाले. लाहिरु कुमारच्या गोलंदाजीवर चेंडू धवनच्या बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये गेला. असेला गुणरत्ने दुसºया स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. धवनला दिलेले हे जीवदान श्रीलंकेला महाग पडले. त्याने १६८ चेंडू टोलवित ३१ चौकारांसह १९० धावा ठोकल्या. दहा धावांनी त्याचे द्विशतक हुकले. पुजारानेही ख्यातीनुरुप खेळून १२ वे कसोटी शतक गाठले.
नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणाºया भारताने प्रत्येक सत्रात एक गडी गमावला. पहिल्या सत्रात १ बाद ११५ धावा होत्या. उपाहार ते चहापान या काळात एकट्या धवनने १२६ धावांची भर घालताच दुसºया सत्रात १६७ धावा निघाल्या आणि एक गडी बाद झाला. तिसºया सत्रातही एका गड्याच्या मोबदल्यात ११७ धावांची भर पडली. पुजाराने मात्र एक टोक सांभाळले. नाबाद ३९ धावा काढणाºया अजिंक्य रहाणेसोबत पुजाराने विक्रमी धावसंख्या नोंदविली. पुजारा-रहाणे यांच्यात चौथ्या गड्यासाठी आतापर्यंत ११३ धावांची भागीदारी झाली. विदेशात पहिल्या दिवशी भारताने याआधी ९ बाद ३७५ धावा उभारल्या होत्या. २००९ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध हा विक्रम होता. पुजाराने २४७ चेंडू टोलवून १२ चौकार मारले. लंकेकडून नुवान प्रदीप याने ६४ धावांत तिन्ही गडी बाद केले. सलामीचा अभिनव मुकुंद (१२) याने स्वत:ला सिद्ध करण्याची संधी गमावली. कर्णधार कोहली (३) देखील आल्या आल्या यष्टिमागे झेल देत परतला. (वृत्तसंस्था)

126 शिखर धवनने उपाहार आणि चहापानाच्या दरम्यान काढल्या. एका दिवसाच्या एका सत्रात एवढ्या धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, वीरेंद्र सेहवागने श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या ब्रेब्रॉर्न स्टेडियमवर एका सत्रात १३३ धावा केल्या होत्या. त्या वेळी सेहवागने २९३ धावांची शानदार खेळी केली होती. गाले कसोटीत शिखरने उपाहारानंतर ६४ धावा केल्या. तो १९० धावांवर बाद झाला.

गुणरत्ने जखमी, पहिल्या कसोटीबाहेर
गाले : भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत फलंदाजीआधीच श्रीलंकेला धक्का बसला. अष्टपैलू खेळाडू असेला गुणरत्ने याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो माघारी परतला. ही दुखापत इतकी गंभीर आहे, की पहिली कसोटी तो खेळू शकणार नाही. स्लीपमध्ये शिखर धवनचा झेल पकडत असताना गुणरत्नेच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला कोलंबो येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्या जखमी अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

03 फलंदाजांनी यापूर्वी एकाच दिवशी मध्यसत्रात शिखर धवनपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. १९५४ मध्ये ट्रेंटब्रिज मैदानावर डेनिस क्रॉम्प्टनने पाकिस्तानविरुद्ध १७३ धावा केल्या होत्या. ही सर्वाधिक धावसंख्या आहे. भारताकडून पॉली उम्रीगर यांनी पोर्ट आॅफ स्पेन येथे १९६१-६२ मध्ये कसोटीच्या एका दिवसात मधल्या सत्रात ११० धावा केल्या होत्या.
187 धावांची सर्वोच्च खेळी यापूर्वी शिखर धवनची होती. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१२-१३ मध्ये पदार्पणातच ही खेळी केली होती. हे त्याचे पाचवे शतक व तिसºयांदा १५० हून अधिक धावसंख्या होती.
07 भारतीय फलंदाज हे १९० या धावसंख्येवर बाद झाले आहेत. त्यात शिखर धवन, के.एल. राहुल यांचाही समावेश आहे. राहुलने इंग्लंडविरुद्ध १९९ धावांची खेळी केली होती. ५३.१२ या सरासरीने शिखरने फलंदाजी केली. त्याची ही कसोटीतील सर्वोच्च सरासरी आहे. शिखरने १६ डावांत ८५० धावा केल्या. यामध्ये त्याच्या ४ शतकांचा समावेश आहे. इतर सामन्यांत २४ डावांत त्याने ८०४ धावा केल्या असून त्याची सरासरी ही ३४.९५ एवढी होती. त्यात एका शतकाचा समावेश आहे.

धवनचे उपाहार ते चहापानादरम्यान दुसरे शतक
धवनने मनसोक्त धावा कुटल्या. करिअरमध्ये दुसºयांदा त्याने उपाहार ते चहापान यादरम्यान शतक ठोकले. याआधी २०१३ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीत पदार्पणाच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती.
या कालावधीत सर्वाधिक धावा काढण्यात जगातील चौथा आणि भारताचा पहिला फलंदाज बनला. ११० चेंडूंत त्याने स्वत:चे पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. नंतर १८७ धावांची आधीची सर्वोच्च खेळीदेखील त्याने मागे टाकली.
चहापानाआधी अँजेलो मॅथ्यूजने त्याचा झेल टिपला. आता मोठी धावसंख्या उभारून श्रीलंकेवर दडपण आणण्याचा भारतीय फलंदाजांचा प्रयत्न असणार आहे.

धावफलक
भारत पहिला डाव: शिखर धवन झे. मॅथ्यूज गो. नुवान प्रदीप १९०, अभिनव मुकुंद झे. डिकवेला गो. प्रदीप १२, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १४४, विराट कोहली झे. डिकवेला गो. प्रदीप ३, अजिंक्य रहाणे खेळत आहे ३९, अवांतर ११, एकूण: ९० षटकांत ३ बाद ३९९ धावा.
गडी बाद क्रम: १/२७, २/२८०, ३/२८६.
गोलंदाजी: नुवान प्रदीप १८-१-६४-३, लाहिरु कुमारा १६-०-९५-०, ुदलरुवान परेरा २५-१-१०३-०, रंगना हेरथ २४-४-९२-०, धनुष्का गुणतिलका ७-०-४१-०.

Web Title: First test Against SL, dhawan & pujara made Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.