केपटाऊन - भुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित माºयाच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७३.१ षटकात २८६ धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने ८७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. फिरकीपटू रविचंद्रन आश्विननेही २१ धावांत २ बळी घेत भुवीला चांगली साथ दिली. त्याचवेळी, एबी डिव्हिलियर्स (६५) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (६२) यांच्या अर्धशतकामुळे यजमानांनी समाधानकारक मजल मारली. मात्र, यानंतर पहिले तीन फलंदाज स्वस्तात गमावल्याने भारतीय संघाचीही ३ बाद २८ धावा अशी घसरगुंडी उडाली.
न्यू लँड्सच्या मैदानावर नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार प्लेसिसने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, भुवीने आपल्या स्विंग माºयाच्या जोरावर प्लेसिसचा निर्णय त्याच्यावरच उलटवला. त्याने डीन एल्गर (०), एडेन मार्करम (५) आणि हुकमी हाशिम आमला (३) यांना तंबूचा रस्ता दाखवत आफ्रिकेची ३ बाद १२ धावा अशी केविलवाणी अवस्था केली. परंतु, एबी आणि प्लेसिस यांनी भारतीयांना पूर्ण वर्चस्व मिळवून दिले नाही.
डिव्हिलियर्स (६५) व कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस (६२) यांनी चौथ्या विकेटसाठी ११४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पदार्पण करणाºया जसप्रीत बुमराह व युवा अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी डिव्हिलियर्स व ड्युप्लेसिस या आक्रमक जोडीला तंबूचा मार्ग दाखविला. क्विंटन डिकाकला (४३) भुवनेश्वरने बाद केले तर मोहम्मद शमीने वेर्नोन फिलँडरला (२३) त्रिफळाचीत केले.
बुमराहने डिव्हिलियर्सला बाद करीत पहिला कसोटी बळी नोंदवला. त्यानंतर तीन षटकांनी पांड्याने ड्युप्लेसिसचा अडथळा दूर केला. ड्युप्लेसिसने कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक झळकावले. डिव्हिलियर्सने लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना ८४ चेंडूंमध्ये ११ चौकार ठोकले. ड्युप्लेसिसने १०४ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार लगावले. डिकॉक व फिलँडर यांनी आक्रमक पवित्रा कायम राखताना सहाव्या विकेटसाठी ५४ चेंडूंमध्ये ६० धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेने ४५ व्या षटकांत २०० धावांचा पल्ला गाठला. भुवनेश्वरने तिसºया स्पेलमध्ये डीकॉकला बाद केले तर शमीने रिव्हर्स स्विंगवर फिलँडरला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर भारताला आणखी एक विकेट मिळण्याची संधी होती, पण भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर केशव महाराजचा झेल तिसºया स्लिपमध्ये धवनला टिपता आला नाही.
डीकॉकने ४० चेंडूमध्ये ७ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली. फिलँडरने ३५ चेंडूत ४ चौकारांसह २३ धावांची झुंजार खेळी केली. यानंतर आफ्रिकेचा डाव झटपट गुंडाळला जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि डेल स्टेन यांनी चिवट फलंदाजी केली. केशवने ४७ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ३५ धावा केल्या. रबाडानेही चांगली खेळी करताना ६६ चेंडूत एक षटकार ठोकताना संयमी २६ धावा केल्या. स्टेन अखेरपर्यंत ३१ चेंडूत नाबाद १६ धावा करुन नाबाद राहिला. गोलंदाजीत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेत भुवी आणि आश्विन यांना चांगली साथ दिली.
यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली खरी, परंतु झटपट तीन बळी गेल्यानंतर पाहुण्यांची पहिल्या दिवसअखेर ११ षटकात ३ बाद ११ धावा अशी अवस्था झाली. आक्रमक सुरुवात करणारा ‘गब्बर’ शिखर धवन (१५), कर्णधार विराट कोहली (५) आणि मुरली विजय (१) झटपट परतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भरवशाचा चेतेश्वर पुजारा (५*) आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (०*) खेळपट्टीवर होते. (वृत्तसंस्था)
निराशाजनक सुरुवात
धावांचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शिखर धवनने ३ खणखणीत चौकार मारत यजमानांना धोक्याचा इशारा दिला. मात्र, वेर्नोन फिलँडर याने ५व्या षटकात भारतीयांना मोठा झटका देत मुरली विजयला डीन एल्गरकरवी झेलबाद केले. विजय १७ चेंडूंमध्ये केवळ एक धाव काढून तंबूत परतला. यानंतर, धवन एक बाजू टिकवून ठेवेल अशी अपेक्षा होती. परंतु, डेल स्टेनच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर आक्रमक फटक्याच्या नादात तो झेलबाद झाला. स्टेननेच त्याचा झेल घेत त्याला माघारी धाडले. यानंतर कर्णधार विराट कोहलीला केवळ ५ धावांत बाद करत मॉर्नी मॉर्केलने भारताची दिवसअखेर ११ षटकात ३ बाद २८ धावा अशी अवस्था केली.
‘स्विंगच्या बादशाह’चा दबदबा
पुरेसे पाणी वापरता न आल्याने खेळपट्टी फलंदाजीला पोषक बनल्यानंतर नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय संघ बॅकफूटवर येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंगच्या जोरावर आफ्रिकेचे पहिले तीन महत्त्वाचे फलंदाज बाद करुन भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली.
‘एबी’ धडाका
यजमान संघ ३ बाद १२ धावा अशा अवस्थेत असताना खेळपट्टीवर आलेल्या ‘मि. ३६०’ एबी डिव्हिलियर्सने आपल्या धडाकेबाज अंदाजात फाटकेबाजी करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्याने कर्णधार फाफ डूप्लेसिससह शतकी धावांची भागीदारी करत संघाला पुनरागमन करुन देण्यात मोलाची भूमिका बजावली. प्लेसिसनेही मोक्याच्यावेळी अर्धशतकी खेळी केली.
बुमराह २९० वा कसोटीपटू
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा नियमित सदस्य बनलेला जसप्रीत बुमराह भारताचा २९० वा कसोटी खेळाडू बनला. द. आफ्रिकेविरुद्ध त्याने शुक्रवारी पदार्पण केले.
विशेष शैली आणि यॉर्करमुळे बुमराह यशस्वी ठरला असून वनडेत ५६ आणि टी-२० मध्ये त्याचे ४० बळी आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यात मिळालेल्या यशाच्या बळावर त्याला कसोटी संघात स्थान मिळाले.
बुमराहने अखेरचा प्रथमश्रेणी रणजी करंडक उपांत्य सामना नागपुरात गुजरातकडून झारखंडविरुद्ध खेळला होता. २६ प्रथमश्रेणी सामन्यात बुमराहचे ८९ बळी आहेत. द. आफ्रिकेत कसोटी पदार्पण करणारा तो सातवा भारतीय खेळाडू आहे.
याआधी अजय जडेजा, प्रवीण आमरे, डोडा गणेश, वीरेंद्र सेहवाग, दीप दासगुप्ता, जयदेव उनाडकट यांनी द. आफ्रिका दौºयात पदार्पण केले होते.
सामन्यातील आकडेवारी
- गेल्या १० वर्षांत केवळ दुसºयांदा भारताच्या चार वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्याच्या एका डावात कमीतकमी एक बळी मिळवण्यात यश मिळवले.
-याआधी २०१३ साली डिव्हिलियर्स - प्लेसिस या जोडीने ५० हून अधिक धावांची भागीदारी केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी डिव्हिलियर्स -प्लेसिस यांनी जोहान्सबर्ग येथे भारताविरुद्धच ही कामगिरी केली होती.
धावफलक
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : एल्गर झे. साहा गो. भुवनेश्वर ००, मार्कराम पायचित गो. भुवनेश्वर ०५, अमला झे. साहा गो. भुवनेश्वर ०३, डिव्हिलियर्स त्रि. गो. बुमराह ६५, ड्यूप्लेसिस झे. साहा गो. पांड्या ६२, डिकॉक झे. साहा गो. भुवनेश्वर ४३, फिलँडर त्रि. गो. शमी २३, महाराज धावबाद २३, रबाडा झे. साहा गो. अश्विन २६, स्टेन नाबाद १६, मोर्कल पायचित गो. अश्विन २. अवांतर(६). एकूण ७३.१ षटकांत सर्वबाद २८६ . बाद क्रम : १-०, २-७, ३-१२, ४-१२६, ५-१४२, ६-२०२, ७-२२१, ८-२५८, ९-२८०, १०-२८६.
गोलंदाजी : भुवनेश्वर १९-४-८७-४, शमी १६-६-४७-१, बुमराह १९-१-७३-१, पांड्या १२-१-५३-१, अश्विन ७.१-१-२१-२.
भारत (पहिला डाव) : विजय झे. एगर गो. फिलँडर ०१, धवन झे. व गो. स्टेन १६, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ०५, विराट कोहली झे. डिकॉक गो. मोर्कल ०५, रोहित शर्मा खेळत आहे ००. अवांतर (१). एकूण ११ षटकांत ३ बाद २८. बाद क्रम : १-१६, २-१८, ३-२७. गोलंदाजी : फिलँडर ४-१-१३-१, स्टेन ४-१-१३-१, मोर्कल २-२-०-१, रबाडा १-०-१-०.
Web Title: First Test: Indians in South Africa have stopped, India's disappointing start
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.