पहिली कसोटी : लंका फॉलोआॅनच्या छायेत

मोहम्मद शमी, उमेश यादवचा भेदक मारा आणि रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा यांच्या फिरकीच्या जोरावर लंकेची दुसºया दिवसअखेर ५ बाद १५४ धावा अशी अवस्था करून सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 02:39 AM2017-07-28T02:39:18+5:302017-07-28T13:01:09+5:30

whatsapp join usJoin us
First Test: Pandya, Shami help India post 600/10 vs Sri Lanka | पहिली कसोटी : लंका फॉलोआॅनच्या छायेत

पहिली कसोटी : लंका फॉलोआॅनच्या छायेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गाले : तळाच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभारला. यानंतर, मोहम्मद शमी, उमेश यादवचा भेदक मारा आणि रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा यांच्या फिरकीच्या जोरावर लंकेची दुसºया दिवसअखेर ५ बाद १५४ धावा अशी अवस्था करून सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
भारताने पहिल्या डावात एव्हरेस्ट उभारताना श्रीलंकेमध्ये दुसºया क्रमांकाची आपली सर्वोत्तम धावसंख्या रचली. दरम्यान, भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अडखळलेले यजमान अजूनही ४४६ धावांनी पिछाडीवर असून, माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (५४*) आणि दिलरुवान परेरा (६*) हे खेळपट्टीवर टिकून आहेत. त्यात श्रीलंकेपुढे फॉलोआॅन टाळण्याचे मुख्य आव्हान असून, प्रमुख फलंदाज तंबूत परतले असल्याने यजमान प्रचंड दडपणाखाली आले आहेत. अद्यापही फॉलोआॅन टाळण्यासाठी लंकेला २४७ धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर उपुल थरंगाने ९३ चेंडूंत १० चौकारांसह ६४ धावांची खेळी केली.
शमीने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करताना ३० धावांत दोन बळी घेतले. त्याने दानुष्का गुनथिलाका (१६) आणि कुसल मेंडिस (०) यांना बाद करून श्रीलंकेला हादरे दिले. तसेच उमेश आणि आश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेत शमीला चांगली साथ दिली. जडेजाला बळी घेण्यात अपयश आले असले तरी, त्याने धावांना मुरड घालताना लंकेवरील दडपण आणखी वाढवले.
तत्पूर्वी, कालच्या ३ बाद ३९९ धावसंख्येवरून सुरुवात केलेल्या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे स्थिरावलेले फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पुजारा दुसºया दिवशी आपल्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ ९ धावांची भर घालून तंबूत परतला. त्याने २६५ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकारांसह एकूण १५३ धावांची खेळी केली. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याने १३० चेंडूत ३ चौकारांसह ५७ धावा केल्या.
यानंतर आश्विन (६० चेंडूत ४७ धावा), कसोटी पदार्पण करणारा हार्दिक पांड्या (४९ चेंडंूत ५० धावा) आणि मोहम्मद शमी (३० चेंडूत ३० धावा) यांच्या मोलाच्या योगदानामुळे भारताने सहाशेचा आकडा गाठला. पांड्याने जबरदस्त खेळी करताना आपल्या पहिल्याच सामन्यात छाप पाडली. त्याने ५ चौकार व ३ षटकारांसह आपली खेळी सजवली. श्रीलंकेकडून नुवान प्रदीपने चमकदार मारा करताना १३२ चेंडूत ६ बळी घेतले. लाहिरु कुमारानेही १३१ चेंडूत ३ बळी घेत चांगला मारा केला. आता, सामन्याच्या तिसºया दिवशी यजमानांचा डाव लवकरात लवकर गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. (वृत्तसंस्था)

कारकिर्दीत पहिल्यांदाच नुवान प्रदीपने एकाच डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली. या कामगिरीसाठी त्याला २५व्या कसोटीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. याआधी त्याने सहा वेळा ४ बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
दुसºयांदा रंगना हेराथला घरच्या मैदानावर बळी घेण्यापूर्वी १००
धावांची खैरात करावी लागली. याआधी याच मैदानावर २००० साली पाकिस्तानविरुद्ध असाच महागडा ठरला होता.


धावफलक
भारत (पहिला डाव): ३ बाद ३९९ धावावरून पुढे चेतेश्वर पुजारा झे. डिकवेल्ला गो. प्रदीप १५३, अजिंक्य रहाणे झे. करुणारत्ने गो. कुमारा ५७, रविचंद्रन आश्विन झे. डिकवेल्ला गो. प्रदीप ४७, वृद्धिमान साहा झे. परेरा गो. हेराथ १६, हार्दिक पांड्या झे. डीसिल्व्हा गो. कुमारा ५०, रवींद्र जडेजा त्रि. गो. प्रदीप १५, मोहम्मद शमी झे. थरंगा गो. कुमारा ३०, उमेश यादव नाबाद ११. अवांतर - १६. एकूण : १३३.१ षटकात सर्व बाद ६०० धावा. गोलंदाजी : नुवान प्रदीप ३१-२-१३२-६; लाहिरु कुमारा २५.१-३-१३१-३; दिलरुवान परेरा ३०-१-१३०-०; रंगना हेराथ ४०-६-१५९-१; दानुष्का गुनथिलाका ७-०-४१-०
श्रीलंका (पहिला डाव) : दिमुथ करुणारत्ने पायचीत गो. उमेश २, उपुल थरंगा धावबाद (मुकुंद / साहा) ६४, दानुष्का गुनथिलाका झे. धवन गो. शमी १६, कुसल मेंडिस झे. धवन गो. शमी ०, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे ५४, निरोशन डिकवेल्ला झे. मुकुंद गो. आश्विन ८, दिलरुवान परेरा खेळत आहे ६. अवांतर - ४. एकूण : ४४ षटकांत ५ बाद १५४ धावा. गोलंदाजी : मोहम्मद शमी ९-२-३०-२; उमेश यादव ८-१-५०-१; रविचंद्रन आश्विन १८-२-४९-१; रवींद्र जडेजा ९-१-२२-०.

Web Title: First Test: Pandya, Shami help India post 600/10 vs Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.