कोलकाता : चेतेश्वर पुजाराने संयम, एकाग्रता आणि कौशल्याचा परिचय देत लंकेच्या गोलंदाजांविरुद्ध एकाही संघर्ष केला. त्याने एक टोक सांभाळताच पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवशी भारताने लंकेविरुद्ध ५ बाद ७४ अशी मजल गाठली. काल केवळ ११.५ तर आज २१ षटकांचाच खेळ झाला.
पहिल्या दिवशी सुरंगा लकमलने भेदक मारा केल्यानंतर आज वेगवान गोलंदाज दासून शनाकाने सकाळच्या सत्रात २३ धावांत दोन गडी बाद केले. अजिंक्य रहाणे(४)आणि रविचंद्रन अश्विन(४)हे त्याचे बळी ठरले. पुजाराने एकाकी संघर्ष केला. ढगाळ वातावरणात हिरव्यागार खेळपट्टीवर त्याने बचावात्मक पवित्रा घेत खराब चेंडूवर धावा काढल्या. तो ४७ धावा काढून नाबाद आहे.
८ धावांवर नाबाद राहिलेल्या पुजाराने १०२ चेंडू खेळून ९ चौकार ठोकले.त्याच्या खेळीतील संयम पाहण्यासारखा होता. शनाकाने तिसºया षटकात रहाणेला यष्टिमागे झेल देण्यास बाध्य केले. लवकरच अश्विन देखील बाद झाला. भारतीय फलंदाजांनी लकमलचा सावधपणे सामना केला. त्याने आतापर्यंत नऊ षटके निर्धाव टाकली आहेत. २४ धावांवर असताना पुजाराच्या हाताच्या खालच्या बाजूला चेंडू लागला. जखमी झाल्यानंतरही विचलित न होता पावसाने हजेरी लावेपर्यंत केवळ खराब चेंडूवर त्याने धावा काढल्या. उपहाराला दहा मिनिटे शिल्लक असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला.
‘द. आफ्रिका दौ-याच्या तयारीसाठी ईडनची खेळपट्टी चांगली’
ईडनवर लंकेविरुद्ध हिरव्यागार खेळपट्टीवर पहिल्या कसोटीत भारतीय संघाची पडझड झाली असली तरी द. आफ्रिका दौºयाच्या तयारीसाठी ही खेळपट्टी अगदी चांगली असल्याचे मत नुकताच निवृत्ती जाहीर करणारा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने व्यक्त केले.
भारतीय संघ पुढील वर्षी ५ जानेवारीपासून द. आफ्रिकेत दोन महिन्यांचा दौरा करीत असून तीन कसोटी, सहा वन डे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.
भारताची गोलंदाजी सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगून नेहरा पुढे म्हणाला,‘ आमच्या फलंदाजांना येथे सुरुवातीला धक्के बसले असले तरी द. आफ्रिका दौºयाची तयारी करण्यासाठी हे वातावरण पूरक आहे.’
नेहराने याच महिन्यात नवी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळून निवृत्ती जाहीर केली. तो म्हणाला,‘ ईडनची खेळपट्टी द. आफ्रिका दौºयाच्या दृष्टीने चांगली आहे. द. आफ्रिकेत अशीच परिस्थिती असेल.
ईडनची खेळपट्टी पुढील आव्हाने पेलण्यास मोलाची ठरणार आहे. या खेळपट्टीवर चेंडू एरवी स्विंग होताना दिसत नाही. पावसामुळे विकेट मंद आहे. त्यामुळे गोलंदाजांना स्विंग आणि सीम दोहोंचाही लाभ होत आहे.’
Web Title: First test: Pujara's lone struggle in rain interruption, India 74 runs for the loss of five wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.