Changes in Cricket: क्रिकेट हा अतिशय चुरशीचा खेळ मानला. क्रिकेटमध्ये कसोटी असो, वन डे असो किंवा टी२० असो.... सर्वच ठिकाणी १-१ धाव महत्त्वाची असते. खेळाडूची विकेट, एखादा कॅच किंवा अगदी एखादी रन यावर सामन्याचा अख्खा निकाल पालटू शकतो. त्यामुळेच क्रिकेटमध्ये शक्य तितकी अचूकता आणली जावी याकडे साऱ्यांचाच कल असतो. याच अनुषंगाने क्रिकेटमध्ये DRS चा समावेश करण्यात आला. एखादा खेळाडू बाद आहे की नाही याबद्दल साशंकता असेल तर DRS च्या मदतीने शहानिशा करता येणं आता शक्य झालं आहे. पण काही वेळा एखाद्या नो बॉल किंवा वाइड बॉलमुळेही अख्खा सामना वेगळीच कलाटणी घेतो. हा निर्णय काही वेळा चुकीचा असल्याचे कळते पण तोवर वेळ निघून गेलेली असते. याच गोष्टींच्या अचूकतेसाठी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक आगळावेगळा निर्णय घेतला गेला आहे.
T20 लीगमध्ये प्रथमच, खेळाडूंना चालू असलेल्या WPL आणि आगामी IPL मध्ये वाइड आणि नो-बॉलसह मैदानावरील कोणत्याही निर्णयाचे पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू (DRS) करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. WPL च्या पहिल्या दोन गेममध्ये अशा दोन घटना रिव्ह्यू केल्या गेल्या, ज्यात विकेटसाठी DRS घेण्यात आलेला नव्हता. "फलंदाज बाद झाला असेल किंवा नसेल तरीही मैदानावरील पंचांच्या कोणत्याही निर्णयाचे DRS रिव्ह्यू केला जाऊ शकतो. तशी विनंती खेळाडू करू शकतो. मात्र टाईम आऊट' (प्लेअर रिव्ह्यू) याला अपवाद असेल. एखाद्या खेळाडूला मैदानावरील पंचांनी वाइड किंवा नो बॉलबाबत घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचेही DRS करण्याचीही परवानगी दिली जाऊ शकते," असे सांगण्यात आले आहे.
कसा असेल पॅटर्न?
आत्तापर्यंत, खेळाडू केवळ मैदानावरील बाद होण्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन करू शकत होते, परंतु आता सुरू असलेल्या WPL आणि IPL मध्ये खेळाडू बाद झाला तरच रिव्ह्यू अशी गरज नाही. यासाठी दोन-दोन रिव्ह्यूच्या संधी दोन्ही संघांना दोन्ही डावात मिळतील. वाइड आणि नो बॉलच्या निर्णयाचे रिव्ह्यू यात करता येईल, मात्र लेग-बाईजच्या निर्णयावर पुनर्विचार केला जाऊ शकणार नाही.
नव्या नियमाचा झाला वापर
शनिवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील WPL स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नवीन नियमाचा वापर करण्यात आला. जेव्हा अंपायरने मुंबईची फिरकीपटू सायका इशाकचा चेंडू लेग साईडला वाइड दिला तेव्हा मुंबईने DRS वापरून तो निर्णय आपल्या बाजूने फिरवला. तसेच, रविवारी दुपारी CCI मध्ये, दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्सने देखील असाच रिव्ह्यू घेतला. तिने शेवटच्या षटकात फुल टॉससाठी नो-बॉल असण्यासाठी DRS घेतला. हा निर्णय रद्द करण्यात आला नाही, पण असा रिव्ह्यूदेखील घेण्यात आला.
Web Title: First time in Cricket History Players can review wide no ball decisions by on field umpires in WPL IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.