Join us  

World Cup 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियम ऐतिहासिक विक्रम रचणार, आजपर्यंतच्या विश्वचषकात असे कधीच घडले नाही

World Cup 2023 Final : दोन्ही संघांच्या नजरा विश्वचषक जिंकण्यावर आहेत. एकीकडे भारत या स्पर्धेत अजिंक्य आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मागील ८ सामने जिंकले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 2:21 PM

Open in App

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 च्या विजेतेपदाच्या लढाईसाठी पूर्णपणे तयार आहेत. अहमदाबादच्यानरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. दरम्यान, अहमदाबादचे हे मैदान आज आपल्या नावावर विश्वविक्रम करणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात असे कधीच घडले नाही, जे या सामन्याच्या सुरुवातीसह होईल. दोन्ही संघांच्या नजरा विश्वचषक जिंकण्यावर आहेत. एकीकडे भारत या स्पर्धेत अजिंक्य आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मागील ८ सामने जिंकले आहेत.

विश्वचषक सामन्यांच्या इतिहासात आजपर्यंत जगातील कोणत्याही स्टेडियममध्ये 1 लाखांहून अधिक चाहत्यांची उपस्थिती नोंदवण्यात आलेली नाही. 2015 मध्ये झालेल्या विश्वचषक फायनलच्या MCG क्रिकेट मैदानावरील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यावेळी सर्वाधिक 93,013 प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली होती, परंतु आज (19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा विक्रम मोडला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 132000 लोक एकत्र बसू शकतात. भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी 130,000 चाहते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. 

अशा परिस्थितीत आज अहमदाबादच्या या मैदानाला ऐतिहासिक कामगिरीचे नाव दिले जाईल. विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक उपस्थितीचा विक्रम नरेंद्र मोदी स्टेडियमच्या नावावर आहे. 2011 च्या विश्वचषकामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वार्टर फायनलची लढत अहमदाबादमध्येच झाली होती. या सामन्यात भारताने 5 गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 6 गडी गमावून 260 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 47.4 षटकात 5 गडी गमावून 261 धावा करत सामना जिंकला होता. भारताने ही स्पर्धा जिंकली होती. उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून 28 वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफी उंचावली.

भारत 2003 चा बदला घेणार?2003 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. अशा स्थितीत आज भारतालाही हा स्कोअर सेट करण्याची संधी आहे. विश्वचषकातील दोन्ही संघांची आमने-सामने आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत विश्वचषकात ते 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने अधिक विजय नोंदवले आहेत. भारताला केवळ 5 सामने जिंकता आले आहेत. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियाच्या नावावर 8 विजय आहेत. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअहमदाबादनरेंद्र मोदी स्टेडियम