कोलकाता - भारतीय संघ पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनीविना वेस्ट इंडिजविरुद्ध उद्या रविवारी ईडनगार्डनवर पहिला टी-२० सामना खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली याने मात्र हा ‘धोनीयुगाचा अस्त’ मानण्यास नकार दिला आहे.दोन वेळा विश्वविजेत्या संघाचा कर्णधार राहिलेल्या धोनीला टी-२० संघातून वगळल्याच्या आठवडाभराने कोहलीने यावर स्पष्टीकरण देताना हा डावपेचांचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले होते. मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनीही धोनीसाठी संघाची दारे बंद झालेली नाहीत, असे म्हटले होते. कोहलीला स्वत: तीन सामन्यांसाठी विश्रांती दिली असून त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे. तर कार्लोस ब्रेथवेटच्या नेतृत्वाखालील विंडीजच्या टी-२० संघाला पाणी पाजणे भारताला सोपे जाणार नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय संघ पहिल्यांदाच धोनीविना खेळणार टी-२०
भारतीय संघ पहिल्यांदाच धोनीविना खेळणार टी-२०
भारतीय संघ पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनीविना वेस्ट इंडिजविरुद्ध उद्या रविवारी ईडनगार्डनवर पहिला टी-२० सामना खेळणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 4:18 AM