Join us  

क्रिकेट विश्वामध्ये हे पहिल्यांदाच घडले, तुम्हाला माहिती आहे का...

सध्याच्या घडीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना सुरु आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 12:15 PM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही घडत असते. काही गोष्टी अशा घडतात की त्या यापूर्वी कधीही घडलेल्या नसतात. अशीच एक गोष्ट क्रिकट विश्वामध्ये घडली आहे, जी कदाचित तुम्हालाही माहिती नसेल.

सध्याच्या घडीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना सुरु आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. या दोन्ही संघांतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला या सामन्यात दोन्ही डावांत एकही धाव करता आली नाही. दोन्ही डावांत तो शून्यावर बाद झाला. त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदलाही या सामन्याती दोन्ही डावांत भोपळाही फोडता आला नाही. एकाच कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत दोन्ही संघांचे कर्णधार शून्यावर बाद व्हावेत, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. या सामन्यात मात्र क्रिकेट विश्वात ही गोष्ट पहिल्यांदा पाहायला मिळाली.

 

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेत अजून एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांत प्लेसिसला एकही धाव करता आली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात मात्र त्याने शतक झळकावले. पहिल्या दोन डावांत भोपळाही न फोडणाऱ्या कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत तिसऱ्या डावात शतक झळकावता आलेले नाही.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाद. आफ्रिकापाकिस्तान