सुनील गावस्कर लिहितात...
नयनरम्य अशा गाले क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात ६०० धावांची भक्कम मजल मारल्यानंतर भारतीयांनी श्रीलंकेची आघाडीची फळी तंबूत धाडण्यात यश मिळवले. मोठी आघाडी घेण्यापासून आता केवळ अँजेलो मॅथ्यूज याचाच अडसर भारताच्या मार्गात आहे. त्यात भर म्हणजे आश्विन आणि जडेजा या दोन्ही फिरकीपटूंना खेळपट्टीकडून उसळ आणि फिरक मिळत असल्याने लंकेपुढे भक्कम फलंदाजी करण्याचे आव्हान आहे. या जोरावरच त्यांना हा सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबवता येईल.
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर डेÑसिंग रूममध्ये यजमान लंकेच्या खेळाडूंना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले असेल. पहिल्या दिवसाचा खेळ बघता नक्कीच त्यांनी गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन केले, शिवाय क्षेत्ररक्षणही खालच्या दर्जाचे होते. पुनरागमन करत असलेल्या शिखर धवनला जीवदान दिल्याचा फटका त्यांना बसला. या जोरावर धवनने १९० धावांची मजबूत खेळी केली. दुसरीकडे, चेतेश्वर पुजारानेही एकेरी-दुहेरी धावांवर भर देत आणखी एक शतक झळकावले.
दुसºया दिवशी यजमानांच्या कामगिरीत फरक दिसून आला. त्यांनी केवळ अचूक टप्प्यावर मारा केला नाही, तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत क्षेत्ररक्षणही चांगले केले. नुवान प्रदीप लक्षवेधी गोलंदाज ठरताना पहिल्या दिवशी घेतलेल्या ३ बळींमध्ये दुसºया दिवशी आणखी ३ बळींची भर पाडली. यामध्ये त्याने शतकवीर पुजाराचा अप्रतिम चेंडूवर बळी मिळवला. तसेच, कुमाराने दुसºया बाजूने आपली छाप पाडताना नियंत्रित माºयासह तीन बळी घेतले.
विश्रांतीमध्ये भारताला सहाशे धावांपर्यंत पोहोचण्यासाठी यजमान कोणतीही संधी देणार नव्हते. परंतु वंडरबॉय हार्दिक पांड्याने भारताला मजबूत धावसंख्या गाठून देताना आक्रमक खेळी करत पदार्पणातच अर्धशतक झळकावले. विश्रांतीनंतर स्लिपमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर पांड्याला जाणीव झाली की, आज त्याचा दिवस आहे. यानंतर त्याने चौफेर फटकेबाजीस सुरुवात केली.
मोहम्मद शमीनेही पुनरागमन करताना आपली छाप पाडत आक्रमक फटकेबाजी केली. तसेच, गोलंदाजीमध्येही त्याच्यावर विशेष लक्ष होते. तो अशा मोजक्या गोलंदाजांपैकी एक आहे, ज्यांच्या गोलंदाजीवर फलंदाज काहीसे उशिराने फटके मारतात. त्याने एकाच षटकात दोन महत्त्वपुर्ण बळी घेतले, ज्यात कुशल मेंडिस शून्यावर परतला.
भारताचे क्षेत्ररक्षणही भक्कम
झाले आणि अभिनव मुकुंदच्या प्रसंगावधनाने सलामीवीर आणि स्थिरावलेला उपुल थरंगाला तंबूची
वाट पकडावी लागली. आता, सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी श्रीलंकेची मदार मॅथ्यूजवर असेल.
पण, पाचव्या दिवसापर्यंत सामना नेण्यासाठी हेदेखील पुरेसे पडणार नाही. (पीएमजी)
Web Title: firts test india vs Sl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.