वयापेक्षा फिटनेस महत्त्वाचा - धोनी

वयाला महत्त्व नसून फिटनेस अधिक महत्त्वाचा ठरतो, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 04:56 AM2018-05-29T04:56:06+5:302018-05-29T04:56:06+5:30

whatsapp join usJoin us
Fitness is important over age - Dhoni | वयापेक्षा फिटनेस महत्त्वाचा - धोनी

वयापेक्षा फिटनेस महत्त्वाचा - धोनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज संघात अनेक अधिक वय असलेले खेळाडू होते, पण तरी आयपीएलच्या ११ व्या पर्वात त्यांनी जेतेपदाचा मान मिळवला. वयाला महत्त्व नसून फिटनेस अधिक महत्त्वाचा ठरतो, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली.
चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करीत तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये जेतेपद पटकावले. सनरायझर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर त्यांनी ६ बाद १७८ धावांची मजल मारली. शेन वॉटसनच्या नाबाद ११७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २ बाद १८१ धावा फटकावित जेतेपदाला गवसणी घातली.
सामन्यानंतर धोनीला अधिक वयाच्या खेळाडूंच्या उपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, ‘वय केवळ एक आकडा आहे, पण खेळाडू पूर्णपणे फिट असणे आवश्यक आहे.’
धोनी म्हणाला, ‘रायुडू ३३ वर्षांचा आहे, पण त्याला महत्त्व नाही. चपळ असलेला खेळाडू संघात हवा का, असा प्रश्न जर कुठल्याही कर्णधाराला विचारला तर त्याचे उत्तर सकारात्मकच राहील. आम्हाला आमची कमकुवत बाजू माहिती होती. जर वॉटसनने सूर मारण्याचा प्रयत्न केला असता तर तो दुखापतग्रस्त होण्याची शक्यता होती, त्यामुळे आम्ही त्याला तसे न करण्याचा सल्ला दिला.’
धोनीने सांगितले, ‘अंतिम फेरी गाठल्यानंतर प्रत्येकाला आपल्या भूमिकेची कल्पना असते. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला तुमच्या रणनीतीनुसार ताळमेळ साधावा लागतो. आमच्या फलंदाजांना त्यांच्या शैलीची कल्पना होती. जर कुणाला अडचण असती तर त्यानंतर येणाºया फलंदाजासाठीही काम सोपे नसते. प्रतिस्पर्धी संघात भुवनेश्वर कुमार व राशिद खान हे दोन चांगले गोलंदाज आहेत, याची कल्पना होती. ते आमच्यावर दडपण निर्माण करू शकत होते. त्यामुळे माझ्या मते आमची फलंदाजी चांगली झाली. मधल्या षटकांमध्ये धावा वसूल करण्याचा विश्वास होता.’
प्रत्येक विजय महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे कुणा एका विजयाची निवड करणे कठीण आहे, असेही धोनीने एका उत्तरात स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

वॉटसनची खेळी अंतर स्पष्ट करणारी : मुडी
वॉटसनची खेळी विशेष होती. आव्हानात्मक मजल मारल्याचे आम्हाला वाटत होते. लक्ष्य गाठण्यासाठी काहीतरी विशेष करण्याची गरज होती आणि वॉटसनने ते केले. आमच्यासाठी यंदाचे सत्र शानदार ठरले, अशी प्रतिक्रिया सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी व्यक्त केली.

अनुभवी खेळाडूंना संधी देण्याचा
निर्णय यशस्वी ठरला : फ्लेमिंग
अनुभवी खेळाडूंना संघात खेळविण्याची रणनीती यशस्वी ठरली, अशी प्रतिक्रिया चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने व्यक्त केली.
फ्लेमिंग म्हणाला, ‘प्रत्येक वर्ष वेगळे असते. फ्रॅन्चायझीने चांगला संघ तयार केला. अन्य संघांनी बदल केला, पण आम्ही अनुभवी खेळाडूंना प्राधान्य दिले.
यंदा आमचा हा फॉर्म्युला
यशस्वी ठरला.’

Web Title: Fitness is important over age - Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.