मुंबई- भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीच्या परफॉर्मन्सबरोबरच यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या गोलंदाजीची कमाल पाहायला मिळाली. कोहलीने या मॅचमध्ये नाबाद 160 रन्स केले. विराटच्या या शतकाबद्दलच्या अनेक खास गोष्टी आहेत.
कोहलीचा सगळ्यात मोठा खेळकेपटाऊनमधील तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर कॅप्टन विराट कोहली मैदानात आला. मॅचच्या शेवटपर्यंत विराट आऊट झाला नाही. या मॅचमध्ये विराटने 159 बॉल्सचा सामना केला. विराटच्या वनडे करिअरमधील ही सर्वात मोठी खेळी बनली आहे. भारतीय खेळाडूकडून खेळली गेलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. याआधी विराट कोहलीने 2012साली ढाकामध्ये पाकिस्तानच्या विरोधात 148 रन्समध्ये 185 रन्स केले होते.
धावून बनवले 100 रन्स
160 नाबाद रन्सच्या शानदार खेळीतील 100 रन्स विराटने धावून बनविले. भारतीय बॅट्समनने धावून 100 रन्स बनविणं पहिल्यांदाच झालं आहे. 160 रन्समध्ये कोहलीने 75 सिंगल्स, 11 डबल आणि 1 वेळा तीन रन धावून काढले. भारताकडून याआधी सौरव गांगुलीने 1999मध्ये 130 रन्समधील 98 रन्स धावून बनविले होते. वनडे क्रिकेटमध्ये धावून सर्वात जास्त रन्स बनविण्याचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनच्या नावे आहे. त्याने 1996मध्ये युएईच्या विरोधात 188 रन्सच्या खेळीत 112 रन्स धावून बनविले आहेत. गांगुलीला टाकलं मागेविराट कोहलीने सौरव गांगुलीचा आणखी एक रेकॉर्ड तोडला आहे. कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना एकुण 12 शतक केली आहेत. भारतासाठी हा एक रेकॉर्ड आहे. याआधी गांगुलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना 11 शतकं केली होती. वनडे इतिहासात कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना सगळ्यात जास्त शतक बनविण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पॉन्टिंगच्या नावे आहे. त्याने 22 शतकं केली आहेत.
रेकॉर्ड सिरीज होण्याच्या दिशेने6 मॅचच्या आधी तीन मॅचमध्ये विराट कोहल चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने 328 रन्स बनविले ज्यामध्ये दोन शतकांचा सहभाग आहे. याआधी विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या ग्राऊंडवर एकही शतक केलं नाही. पण सिरीजच्या पहिल्या तीन मॅचमध्ये त्याने दोन शतकं करून त्याने एक रेकॉर्डची सिरीज बनविण्याकडे पाऊल उचललं आहे.
विराट अजूनही सचिनच्या मागेविराट कोहलीने 160 रन्सची खेळी ही भारताकडून दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळली गेलेली दुसरी मोठी खेळी आहे. विराटपेक्षा जास्त धावांची खेळी सचिन तेंडुलकरने केली होती. त्याने 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात दुहेरी शतक झळकावलं होत.