रोहितसह पाच खेळाडूंनी मोडला नियम, विलगीकरणात रवानगी

Team India: क्रिकेट ऑस्ट्रेलियाची माहिती : हॉटेलमध्ये जेवण घेत जैवसुरक्षा नियमाचा भंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:10 AM2021-01-03T05:10:55+5:302021-01-03T05:11:18+5:30

whatsapp join usJoin us
Five players, including Rohit, broke the rules and left for segregation | रोहितसह पाच खेळाडूंनी मोडला नियम, विलगीकरणात रवानगी

रोहितसह पाच खेळाडूंनी मोडला नियम, विलगीकरणात रवानगी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोना जैवसुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सर्वांना पुढील चौकशीपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.


बिल भरणाऱ्या चाहत्याला द्यावे लागले स्पष्टीकरण
पंतने चाहत्याला मिठी मारल्याची बातमी मिळाली होती; पण नंतर त्या चाहत्याने असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तथापि खबरदारीचा उपाय म्हणून या घडलेल्या प्रकाराबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करीत आहेत. या प्रकरणात कोरोनासंदर्भातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास केला जात आहे. प्राथमिक उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया आणि भारतीय वैद्यकीय समितीच्या सल्ल्यानुसार या पाच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रवासाच्या वेळी किंवा सराव करताना या पाच खेळाडूंना इतर खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

भारतीय संघाविरुद्ध आगपाखड सुरू :  बीसीसीआय  
मेलबोर्न : स्थानिक हाॅटेलमध्ये जेवण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी जैवसुरक्षा नियमांचा भंग केल्याचे वृत्त स्थानिक मीडियाने शनिवारी प्रसिद्ध करताच नवा वाद उत्पन्न झाला. 
ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या कसोटीत पराभूत झाल्यापासून मीडियातील काहीजण हेतुपरस्पर भारतीय संघाविरोधात खोडसाळपणे लिहीत असल्याचा आरोपही ‘बीसीसीआय’ने केला. बोर्डाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, भारतीय संघाला कोरोना नियमावलीची चांगली जाण आहे. कोणत्याही खेळाडूने नियमभंग केलेला नाही.’ 
या वादाची पार्श्वभूमी थोडक्यात अशी :  सिडनीला पोहोचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबोर्न येथेच सराव करीत आहेत. फावल्या वेळेत ते मेलबोर्न मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये स्थानिक जेवणाचा आनंद घेत आहेत. रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॅा, शुभमन गिल आणि नवदीप सैनी एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. 
नवलदीपसिंग या चाहत्याने त्यांना पाहिले. हा चाहता खेळाडूंच्या जवळच्या टेबलवर बसला होता. त्याने या खेळाडूंचा छोटा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. या प्रकारामुळे भारतीय चाहत्यांनी नवलदीपवर टीकेचा भडिमार केला. मला टीकेमुळे 
 वाईट वाटत नाही, पण या क्षणी भारतीय माझ्या विरोधात गेल्यामुळे वाईट वाटते. मला भारतीय चाहते शिवीगाळ करीत आहेत, पण त्याचा फरक पडत नाही. आम्ही मित्रांमध्ये ४००-५०० शिव्या शेअर करतो, पण यावेळी मात्र मला खरेच वाईट वाटत आहे. सर्वकाही ठीक होईल, अशी अपेक्षा आहे.

पंतची गळाभेट घेतल्याचाही दावा
नवलदीपसिंग याने ऋषभ पंत याची गळाभेट घेतल्याचाही दावा केला. नवलदीप आपल्या पत्नीसोबत जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेला होता. आपल्या आवडत्या खेळाडूंना आणखी काही वेळ पाहाता यावे यासाठी त्याने स्वत:साठी अतिरिक्त डिशही मागवली. तसेच त्याने चक्क भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे बिलही भरले. बिल भरल्याचे सुरुवातीला क्रिकेटपटूंना माहीत नव्हते. ट्विटरवरुन माहिती देताना बिल भरल्याचा दावा केला. नियमानुसार  आवश्यक काळजी घेत बाहेर जेवणाला जाण्याची परवानगी आहे. 


बिलाची रक्कम...
नवलदीप सिंगने ट्विटर पोस्ट केलेल्या फोटोनुसार, रोहित शर्मा आणि क्रिकेटपटूंनी सॉय चिकन, चिकन मशरुम आणि डायट कोक अशी ऑर्डर दिली होती. याचे बिल ११८.६९ डॉलर (जवळपास ६,६८३ रुपये) एवढे आले होते.  

Web Title: Five players, including Rohit, broke the rules and left for segregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.