वूड्सच्या शरीरात आढळले पाच अमली पदार्थ

जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल गोल्फर टायगर वूड्स याला जेव्हा नशेमध्ये वाहन चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:01 AM2017-08-16T04:01:51+5:302017-08-16T04:01:54+5:30

whatsapp join usJoin us
Five substances found in the body of woods | वूड्सच्या शरीरात आढळले पाच अमली पदार्थ

वूड्सच्या शरीरात आढळले पाच अमली पदार्थ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉस एंजलिस : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल गोल्फर टायगर वूड्स याला जेव्हा नशेमध्ये वाहन चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये पाच प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले. यामध्ये वेदनाशमक हायड्रोकोडोन याचाही समावेश आहे. वूड्सची लघवी तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात विकोडिन नावाने विक्री होत असलेल्या हायड्रोकोडेनसह त्याच्या शरीरामध्ये अन्य चार अमली पदार्थ आढळून आल्याचा खुलासा झाला आहे. वूड्सच्या शरीरात वेदनाशामक हायड्रोमोर्फोन, अलप्राजोलम, झोपेचे औषध जोलपिडम आणि टीएचसी यांचेही प्रमाण आढळले आहे.
२० मे रोजी वूड्सला फ्लोरिडाच्या ज्युपिटर येथे अटक झाली होती. ज्या वेळी पोलिसांना वूड्स मिळाला, तेव्हा तो आपल्याच घराशेजारी एका आलिशान कारमध्ये झोपला होता. त्या वेळी आपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार काही औषधे घेतली होती. यामुळे माझी अशी अवस्था झाली, असे वूड्सने पोलिसांना सांगितले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Five substances found in the body of woods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.