Join us

अबुधाबी टी १० लीगमध्ये फिक्सिंग?; आंद्रे रसेल, किरोन पोलार्ड चौकशीच्या फेऱ्यात

लीग फिक्सिंगच्या वादात सापडल्याने हे सर्व खेळाडूही चौकशीच्या भोवऱ्यात अडकणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 12:48 IST

Open in App

अबुधाबी : येथील टी-१० लीग आयसीसी अँटी करप्शन युनिटच्या रडारवर आली आहे. या लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप होत आहेत. ब्रिटनमधील डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीचे अँटी करप्शन युनिट या लीगविरुद्धच्या सहा गंभीर आरोपांची चौकशी करणार आहे. या लीगमध्ये आयपीएलमधील केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू किरोन पोलार्डदेखील खेळले होते.

भारतात सोनी स्पोर्ट्सवरून प्रसारण झाले होते. या लीगमध्ये भारताचे माजी खेळाडू युवराज सिंग आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैनानेदेखील सहभाग नोंदवला आहे. १० षटकांच्या या लीगमध्ये जगभरातील नामवंत क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. त्यातच ही लीग फिक्सिंगच्या वादात सापडल्याने हे सर्व खेळाडूही चौकशीच्या भोवऱ्यात अडकणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

असे झाले आरोप......

डेली मेलने आपल्या वृत्तात आयसीसीकडे अबुधाबी टी-२० लीगविरुद्ध डझनभरापेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. आयसीसीच्या तपास यंत्रणेला या स्पर्धेत वेगळ्या स्तरावरील बेटिंग सुरु असल्याचा संशय आहे. जवळपास १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बुकींनी स्पर्धेत लावल्याची शक्यता असून लीगमधील प्रत्येक संघाला बेटिंग कंपन्या पुरस्कृत करीत आहेत.

सहभागी संघातदेखील संशयास्पद हालचाली सुरु असल्याची तक्रार आयसीसीकडे दाखल झाली आहे. फ्रेंन्चायजींचे मालक गोलंदाज आणि फलंदाजांना आधीच सूचना देत आहेत. स्टार क्रिकेटपटूंना कोणतीही माहिती न देता सामन्यातून वगळण्यात येत आहे. काही फलंदाज तर आश्चर्यकारकरीत्या स्वतःचा बळी देत आहेत.

टॅग्स :किरॉन पोलार्डवेस्ट इंडिज
Open in App