मुंबई - जागतिक क्रिकेटसाठी मावळते वर्ष शानदार गेलं. प्रत्येक संघानं चांगली कामगिरी केली असली तरी काही खेळाडूंसाठी हे वर्ष खराब गेलं आहे. रोहित, विराट, स्मिथ, डिव्हिलर्स, कुक यांनी वर्ष गाजवलं. पण असे काही दिग्गज खेळाडूं आहेत. त्यांना कर्तुत्वाला साजेशी कामगिरी करता आली नाही. प्रतिस्पर्धी संघावार वर्चस्व गाजवणारे आणि एकहाती सामना जिंकून देण्याची त्यांच्यात कुवत आहे. पण त्यांना तसी कामगिरी करता आली नाही. अशाच काही खेळांडू विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
युवराज सिंग
भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडणाऱ्या आक्रमक डावखुरा फलंदाज युवराज सिंगसाठी 2017 हे वर्ष फारसं चांगल गेलं नाही. वर्षभरात युवराजला फक्त 11 वन-डे सामनं खेळता आले. यामधील 10 डावांत फलंदाजी करताना त्यानं एक शतक आणि एका अर्धशतकासह 372 धावा केल्या आहेत. 2017 मध्ये युवराज खेळलेल्या तीन टी-20 सामन्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्याची ही कामगिरी पाहून असं वाटत की..हाच तो युवराज आहे का...त्यानं भारताला अनेक विजय मिळवून दिले...किंवा सलग सहा षटकार लगावले. संध्या तो संघाबाहेर जरी असला तरी त्याचं पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे...कारण म्हणतात ना ...शेर जब "दो" कदम पीछे हट गया तो इसका मतलब ये नहीं की वो डर गया, बल्कि समझो अब शिकार दुनिया से उठ गया...असाच युवराज बद्दल प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये धाक आहे. कसोटी बद्दल बोलायचं झाल्यास...सिक्सस किंग युवराज कसोटी सामन्यापेक्षा वन-डे आणि टी-20मध्येच रमला. 2011 विश्वचषक विजयात महत्वपुर्ण भूमिका बजवणाऱ्या युवराजला कसोटीत मात्र अपयश आलं आहे. युवराजनं शेवटची कसोटी 2012 मध्ये खेळली आहे.
सुरेश रैना
मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज आणि टी-20 स्पेशालिस्ट म्हणून सुरेश रैनाकडे पहायले जात होतं. पण 2015 पासून फॉर्म त्याच्यावर रुसलाच आहे. यावर्षी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली नव्हती. युवराज सिंगप्रमाणेच रैनाही कसोटीमध्ये कधी रमलाच नाही. 2015 मध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी दोन्ही त्याला एकही धाव करता आली नव्हती. 2017मध्ये रैना 20 वन-डेत फलंदाजी करताना एक शतक आणि चार अर्धशतकासह 517 धावा काढल्यात. तर तीन टी-20मध्ये एका अर्धशतकासह 100 धावा काढल्या आहेत.
मनिष पांडे
आयपीएलमध्ये खोऱ्यानं धावा काढणाऱ्या मनिष पांडेसाठी भारतीय संघाचा दरवाजा 2015 मध्ये उघडला. प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. पण त्याला मिलालेल्या संधीचं सोन करता आलं नाही. त्याच्या या वर्षातील आकडेवारीवरुन तर तसेच दिसून येतंय. पांडेनं 2017 मध्ये 10 वन-डेती 8 डावात फलंदाजी करताना एका अर्धशतकासह फक्त 171 धावा काढल्या आहेत. पांडेला भारतीय संघात सुरैश रैनाच्या जागेवर खेळवलं जातंय पण त्याला तशी कामगिरी करता येत नाही. वन-डे प्रमाणंच त्यानं टी-20मध्ये फारशी चमक दाखवली नाही. इथही तो अपयशीच ठरला. या वर्षी त्यानं नऊ टी-20 सामने खेळला. आठ डावांत फलंदाजी करताना त्याला फक्त एक अर्धशतक करता आलं. नऊ टी-20 सामन्यात त्याला 172 धावा करता आल्या.
ख्रिस गेल
षटकारांचा बादशाह...म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये गेलला ओळखलं जातं. जर गेल खेळयला लागला तर मैदानावर वादळ येतं...पण आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला या वर्षी आपला जलावा दाखवता आला नाही..2017 मध्ये गेल पूर्णपणे अपशी ठरला...वर्षभरात गेल सहा वन-डे सामने खेळला..यामध्ये त्यानं फक्त 199 धावा केल्या. तर दोन टी-20 सामन्यामध्ये त्याला फक्त 58 धावांच करता आल्या.
कामरान अकमल
पाकिस्तानच्या अनुभवी कामरान अकमलला या वर्षी संघर्ष करावा लागला. त्याला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. चार टी-20 सामन्यात त्याला फक्त 90 धावा करता आल्या. तर तीन वन-डेत फक्त 68 धावा करता आल्या.
कोरी अँडरसन
न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने यावर्षी खेळलेल्या चार टी-20 सामन्यात एका अर्धशतकासह फक्त 94 धावा केल्या. तर पाच वन-डेमध्ये त्याला फक्त 62 धावाच करता आल्या. यादरम्यानं त्यानं पाच विकेटही घेतल्या. गेल्या काही वर्षातील आणि 2017तील कामगिरी पाहता कोरी अँडरसन या वर्षी आपली कामगिरी चोख बजावू शकला नाही.
ग्लेन मॅक्सवेल
जगातील कोणत्याही मैदानावर षटकार-चौकारांची आतिषबाजी करणाऱ्या मॅक्सवेलसाठी हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच गेलं आहे. 2017 मध्ये त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेलनं यावर्षी चार कसोटीतील आठ डावांत फलंदाजी करताना एका शतकासह 259 धावा तर गोलंदाजी करताना फक्त एक विकेट घेता आली. 13 वन-डेतीस 10 डावात फलंदाजी करताना दोन अर्धशतकासह 272 धावा केल्या. तर गोलंदाजी कराताना त्याला एकही बळी मिळवता आला नाही. टी-20 स्पेशालिस्ट म्हणून मॅक्सवेलकडे पाहिलं जात पण प्रत्येक्षात मात्र यावर्षी त्याला फक्त दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. दोन सामन्यातील एका डावात फलंदाजी करताना त्याला फक्त 17 धावा करता आल्या. यामध्ये त्यानं तीन बळी मिळवलं.
ग्रँट इलियट
न्यूझीलंडच्या या अनुभवी खेळाडूचं हे वर्ष अतिशय खराब गेलं. ग्रँट एलियटनं यावर्षी एकही वन-डे सामना खेळाला नाही. खराब कामगिरीमुळे त्याची न्यूझीलंडच्या संघात संधीच दिली नाही. एककाळ तो संघाचा भरवशाचा खेळाडू होता. पण खराब कामगिरीमुळं त्याची वन-डेत निवड झाली नाही. 2017 मध्ये ग्रँट एलियटला न्यूझीलंडनं एका सामन्यात संधी दिली. त्या सामन्यात त्याला आपल्या लौकिकास साजेल अशी खेळी कराता आली नाही. एकमेव टी-20 सामन्यात त्याला फक्त 14 करता आल्या.
Web Title: # FlashBack2017: These batsmen failed this year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.