कृष्णवर्णीय खेळाडूंनी घटनेविरुद्ध उठविला आवाज; डॅरेन सामी, ख्रिस गेल, टायगर वुड्स यांनी केला विरोधएक कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडवर पोलीस अत्याचाराविरुद्ध क्रीडा जगतात वादळ उठले आहे. २५ मे रोजी अमेरिकेतील मिनेसोटा राज्याच्या मिनीपोलीसच्या एका श्वेत पोलीस अधिकाऱ्याने फ्लॉयडचे हात बांधून पायाने त्याचा गळा दाबला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेत हिंसक प्रदर्शने सुरू आहेत. विविध खेळांतील कृष्णवर्णीय खेळाडूंनी या घटनेचा विरोध करीत याविरुद्ध आवाज उठविला.वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवा - डेरेन सॅमीकिंग्स्टन : वर्णद्वेषाविरुद्ध आवाज बुलंद करा, अन्यथा तुम्हीदेखील या समस्येचा भाग आहात, असे समजले जाईल, असे परखड मत मांडताना वेस्ट इंडिजचा विश्वचषक विजेता कर्णधार डेरेन सॅमी याने आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषद आणि प्रत्येक क्रिकेट बोर्डाला पुढे येऊन विरोध करण्याचे आवाहन केले आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीला अमेरिकेत पोलीस कस्टडीमध्ये प्राण गमवावे लागले. जॉर्जच्या मानेवर पाय ठेवून बसलेल्या पोलीस अधिकाºयाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या प्रकारानंतर अमेरिकेत सध्या संतापाचे वातावरण आहे. जॉर्जला न्याय मिळावा यासाठी अनेक कृष्णवर्णीय नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. जागतिक पातळीवर या घटनेचा निषेध होत असताना आता क्रिकेटपटूंनीही वर्णद्वेषाविरोधात मत मांडण्यास सुरुवात केली आहे. डेरेन सॅमीने क्रिकेटविश्वाला अशा घटनांवर व्यक्त होण्याची विनंती केली. तो म्हणाला, ‘सद्यस्थितीत क्रिकेट विश्वाने विरोधात आवाज उठवला नाहीत, तर तुम्हीही या समस्येचा भाग बनला आहात असा संदेश जाईल. माझ्यासारख्या अनेक कृष्णवर्णीय खेळाडूंसोबत काय अन्याय होतो, हे आयसीसी आणि क्रिकेट बोर्डाला दिसत नाही का?क्रिकेटमध्येही होतो वर्णद्वेष - गेलनवी दिल्ली : ‘क्रिकेटमध्ये वर्णद्वेष होत असल्याचा आरोप वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याने केला असून आपल्यालाही अनेकदा वर्णभेदाचा सामना करावा लागला,’ असे या दिग्गज खेळाडूने म्हटले आहे. ‘इतरांप्रमाणे प्रत्येक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या आयुष्यालाही तितकेच महत्त्व आहे. वर्णद्वेष करणाºया लोकांनी आम्हाला मूर्ख समजणे बंद करावे. कधी कधी आमच्यापैकी काही लोक इतरांना वर्णद्वेष करण्याची संधी देत असतात, आपल्याला कमी लेखणे थांबवा असे आवाहन मी करेन. मी आतापर्यंत अनेक देश फिरून आलोय, मी कृष्णवर्णीय असल्यामुळे मलाही भेदभावाचा सामना करावा लागला आहे. विश्वास ठेवा, वर्णद्वेष हा फक्त फुटबॉलमध्ये नाही तर तो क्रिकेटमध्येही आहे. अनेक संघांमध्ये हा प्रकार होतो,’ अशा आशयाचा संदेश गेलने स्वत:च्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिला.पोलिसांनी ओलांडली मर्यादा - टायगर वूड्सवॉशिंग्टन : जॉर्ज फ्लॉयड मृत्यू प्रकरणी दिग्गज गोल्फपटू टायगर वूड्स याने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी अत्याचाराचा कळस गाठला असून कायद्याची मर्यादा ओलांडल्याचा आरोप वूड्स याने केला. माझ्या संवेदना फ्लॉयड, त्याचे कुटुंबीय आणि अत्याचाराचा सामना करणाºया नागरिकांसोबत असल्याचे वूड्सने म्हटले आहे. ‘कायदे राबविणाऱ्यांचा मी नेहमी आदर केला. ज्यांना कायद्याचे शिक्षण दिले जाते, त्या पोलिसांनी उल्लंघन करावे, हे आश्चर्यकारक असल्याचे वूड्सने म्हटले आहेअंत्यसंस्काराचा खर्च मेवेदर करणारन्यूयॉर्क : पोलिसांच्या अत्याचाराचा बळी ठरलेला कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड याच्या अंत्यसंस्काराचा खर्च माजी चॅम्पियन बॉक्सर फ्लॉयड मेवेदर करणार आहे. मृताच्या कुटुंबीयांच्या आपण संपर्कात असून ९ जून रोजी फ्लॉयडचे गृहनगर ह्युस्टन येथे होणाºया अंत्यविधीचा आणि शोकसभेचा खर्च करू, असे मेवेदरने म्हटले आहे. मेवेदरने याआधी आपल्या प्रतिस्पर्धी बॉक्सरच्या अंत्यविधीचादेखील खर्च केला होता.फ्लॉयडच्या समर्थनार्थ शर्टघालणाºयास फटकारलेबुडापेस्ट : हंगेरी फुटबॉल महासंघाने आफ्रिकी मूळचा खेळाडू तोकमेक एनगुएनला लिखित ताकीद दिली. त्याने गोल नोंदवल्यानंतर आपले शर्ट वर केले. त्याखाली असलेल्या कपड्यावर ‘जॉर्ज फ्लॉयडसाठी न्याय’ असे लिहिले होते. तोकमेक एनगुएनचा जन्म केनियाच्या शरणार्थी शिबिरात झाला आहे. त्याचे आई-वडील दक्षिण सुदानमधील आहेत. एनगुएन नॉर्वेमध्ये लहानाचा मोठा झाला.समर्थन करणाºयांना फिफाचा पाठिंबाझुरिच : फुटबॉल सामन्यादरम्यान जॉर्ज फ्लॉयडप्रति एकजूट होणाºया खेळाडूंवर बंदी घालू नये, असे आवाहन फिफाने आयोजकांना केले आहे. खरेतर फिफा असे आवाहन कधीही करीत नाही, मात्र फुटबॉल चाहत्यांप्रति सध्या लवचिक धोरण अवलंबणे आणि त्यांच्याप्रति कायद्याचे शस्त्र न उगारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गत आठवड्यात जर्मनीत झालेल्या सामन्याच्यावेळी चाहत्यांंनी फ्लॉयडप्रति संवेदना व्यक्त करणारे फलक आणले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- फ्लॉयडच्या हत्येमुळे क्रीडाक्षेत्रात वादळ
फ्लॉयडच्या हत्येमुळे क्रीडाक्षेत्रात वादळ
अमेरिकेतील मिनेसोटा राज्याच्या मिनीपोलीसच्या एका श्वेत पोलीस अधिकाऱ्याने फ्लॉयडचे हात बांधून पायाने त्याचा गळा दाबला.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 4:48 AM