कोलकाता : श्रीलंकेविरुद्ध ९-० ने विजय मिळवल्याचा या मालिकेवर कुठलाही प्रभाव पडणार नसून कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यावर संघाचे लक्ष केंद्रित राहील, अशी प्रतिक्रिया भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली.
भारताने श्रीलंका दौºयात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्व सामने जिंकले. आता भारतीय संघ तीन कसोटी, तीन वन-डे व तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवित आहे.
ईडन गार्डन्सवर सराव सत्रानंतर बोलताना रहाणे म्हणाला,‘गेल्या मालिकेच्या तुलनेत ही मालिका एकदम वेगळी आहे. आमचा श्रीलंका दौरा संस्मरणीय ठरला असला तरी आम्ही श्रीलंका संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. सध्यातरी आम्हाला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे. आम्ही प्रत्येक मालिका जिंकण्यास इच्छुक आहोत. आम्हाला येथील परिस्थितीबाबत चांगली माहिती आहे.’
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौºयावर जाणार आहे. या दौºयात भारतीय संघ तीन कसोटी, सहा वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे.
रहाणे पुढे म्हणाला,‘आम्हा सर्वांसाठी दक्षिण आफ्रिका दौºयापूर्वी प्रत्येक लढत व प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिकेबाबत आम्ही तेथे जाण्यापूर्वी विचार करू. सध्या आमचे लक्ष श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवर आहे. दक्षिण आफ्रिकेचा दौरा एकदम वेगळा राहील. श्रीलंकेसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यांनी चांगली तयारी केली आहे. आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. आमची नजर या मालिकेवर व खेळल्या जाणाºया प्रत्येक लढतीवर आहे. आम्ही त्यांच्या रणनीतीबाबत विचार करण्यापेक्षा आपल्या ताकदीवर लक्ष देणार आहोत.’
श्रीलंकेत १२ ते १४ आॅगस्टपर्यंतच्या अखेरच्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ सातत्याने मर्यादित षटकांचे सामने खेळत आहे. त्यात आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मालिकांचा समावेश आहे. रहाणे पुढे म्हणाला,‘प्रत्येकाला वेगळ्या स्वरूपाच्या क्रिकेटसाठी कसे सज्ज व्हायचे, याची कल्पना आहे. माझ्या मते यात कुठली अडचण येईल, असे वाटत नाही. सर्व व्यावसायिक खेळाडू आहेत. पहिला कसोटी सामना लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.’
ओडिशा व बडोदा यांच्याविरुद्ध गेल्या दोन रणजी सामन्यांत ४९ व ४५ धावांवर बाद होणाºया रहाणेने हा चिंतेचा विषय नसल्याचे म्हटले आहे.(वृत्तसंस्था)
Web Title: Focusing on maintaining top position in Test cricket: Ajinkya Rahane
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.