अजीझ मेमन
साधारणपणे तीन महिन्यांहून अधिक काळानंतर आंतरराष्टÑीय क्रिकेट पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत. जुलै महिन्यात वेस्ट इंडिज व पाकिस्तानचे संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव होण्यापूर्वी इंग्लंड व न्यूझीलंड दरम्यान मार्च महिन्यात रिकाम्या स्टेडियमवर शेवटचा एकदिवसीय सामना खेळविला गेला होता. त्यानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे उर्वरित सामने रद्द करण्यात आले. मागील आठवड्यात इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेस्ट इंडिज व पाकिस्तान दौºयाला दुजोरा दिला आहे. यामुळे क्रिकेट जगताला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, अजून यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
क्रिकेट खेळण्यातील सर्वांत मोठा अडथळा हा कोरोना आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. अनेक देशांनी अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी बंधने शिथिल केलेली आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही या महामारीचा धोका असल्याचे सांगितले आहे. जर इंग्लंडमध्ये या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली, तर पुन्हा निर्बंध येऊ शकतात. याचा परिणाम आंतरराष्टÑीय क्रिकेट वेळापत्रकावर होईल. जनजीवन सामान्य पदावर येण्यासाठी रुग्णांच्या व बाधितांच्या संख्येत घट होणे गरजेचे आहे. मात्र, क्रिकेट मंडळांनी खेळाडूंच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या तीनही खेळाडूंवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने घेतला आहे. असे असले तरी दौºयावर जाणाºया खेळाडूंच्या मनातही भीती असू शकते. पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही त्यांच्या खेळाडूंना निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे. यामुळे अनिवार्यपणे आयपीएलवर चर्चा करावी लागते. ही स्पर्धा सप्टेंबर, आॅक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये खेळवली जाऊ शकते. रिकाम्या स्टेडियमवर ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रसारणाच्या हक्कामुळे या स्पर्धेला मोठा आर्थिक फटका बसणार नाही.मात्र, काही परदेशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यास उत्सुक नसतील. तरीही काही जणांच्या मते केवळ भारतीय खेळाडूंना घेऊनही आयपीएल यशस्वी होऊ शकते. मात्र, यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता कमी होऊ शकेल. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने क्रिकेट खेळवले जाण्यावर प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. त्याच्या मते अद्यापही धोका टळलेला नाही. प्रसारमाध्यमांना तो म्हणाला होता की, ‘जर एखाद्या कसोटीदरम्यान एखादा खेळाडू पॉझिटिव्ह निघाला, तर ती कसोटी रद्द करणार का? कारण सरकारी निर्देशानुसार असे झाले तर त्या सामन्याशी संबंधित सर्वांनाच अलगीकरण करावे लागेल.’ ही स्थिती उत्पन्न होऊ शकते. मात्र, आता सर्वांचेच लक्ष जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाºया क्रिकेट मालिकेकडे लागले आहे. तेथे कोणतीही अनुचित घटना होऊ नये असेच सर्वांना वाटते.क्रिकेट पुन्हा सुरू होण्यात कोरोना एकमेव अडथळा आहे असे नाही. अशा स्थितीत मैदानावर उतरण्यास सर्वच खेळाडू उत्सुक आहेत असे चित्र नाही. व्यवस्थापक व क्रिकेट मंडळांच्या दृष्टीने ही डोकेदुखी ठरू शकते. क्रिकेट पुन्हा सुरू होण्यात हा एकमेव अडथळा आहे असे नाही. उदाहरणादाखल वेस्ट इंडिजच्या २५ जणांच्या संघातील तीन खेळाडूंनी इंग्लंड दौºयावर जाण्यास नकार दिला. हेटमेअर, ब्राव्हो व पॉल यांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या दौºयातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
(लेखक लोकमत वृत्तसमुहात सल्लागार संपादकीय आहेत)