Shahid Afridi: "मला पाकिस्तानसाठी 2 संघ तयार करायचे आहेत", शाहिद आफ्रिदीचे BCCIच्या पावलावर पाऊल

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 2 संघ करायच्या दिशेने पाऊले टाकत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 02:27 PM2023-01-01T14:27:56+5:302023-01-01T14:28:33+5:30

whatsapp join usJoin us
Following BCCI's footsteps, Pakistan's Shahid Afridi said, I want to form two teams for Pakistan   | Shahid Afridi: "मला पाकिस्तानसाठी 2 संघ तयार करायचे आहेत", शाहिद आफ्रिदीचे BCCIच्या पावलावर पाऊल

Shahid Afridi: "मला पाकिस्तानसाठी 2 संघ तयार करायचे आहेत", शाहिद आफ्रिदीचे BCCIच्या पावलावर पाऊल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : जेव्हापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या बेंच स्ट्रेंथचा वापर करून एकाच वेळी दोन भारतीय संघ तयार केले आहेत. तेव्हापासून इतर देशांसमोरही एक आदर्श निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच इतर देशांचे संघही बीसीसीआयच्या मार्गावर जाऊ लागले आहेत. आता याच मार्गावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) पाऊल टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अंतरिम निवड समितीचा अध्यक्ष शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, त्याला संघाचे बेंच स्ट्रेंथ सुधारण्यासाठी पाकिस्तानसाठी दोन संघ हवे आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना आफ्रिदी म्हणाला, "मला बेंच स्ट्रेंथ सुधारण्यासाठी माझ्या कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी पाकिस्तानसाठी दोन संघ हवे आहेत. मला वाटते की पूर्वी संवादाचा अभाव होता. मात्र, आता मी वैयक्तिकरित्या खेळाडूंशी बोललो आहे आणि त्यांच्याशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे."

आफ्रिदीचे BCCIच्या पावलावर पाऊल  
पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्या अनुपस्थितीत पाकिस्तानने घरच्या मैदानावर कसोटी मालिका 0-3 ने गमावली. इंग्लंडविरूद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदाचा कारभार स्वीकारताच आफ्रिदीने महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरूवात केली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानी वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. खरं तर यजमान संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात लाज वाचवली आणि सामना अनिर्णित केला. त्यामुळे पाकिस्तान बोर्ड 2 संघ तयार करण्याच्या तयारीत आहे.

खेळाडू आणि अधिकाऱ्यांमध्ये संवाद व्हायला हवा - आफ्रिदी 
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने असेही सांगितले की, त्याला खेळाडू आणि अधिकारी यांच्यातील संवादातील अंतर कमी करायचे आहे. याशिवाय आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी फखर जमान आणि हारिस सोहेलची निवडही योग्य ठरवली आहे. तो म्हणाला, "मी थेट हारिस आणि फखरशी बोललो आणि त्यांची टेस्ट घेतली. ते दोघेही तंदुरूस्त असून मला वाटते की खेळाडू आणि अधिकाऱ्यांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे." अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची निवड झाली असून रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Following BCCI's footsteps, Pakistan's Shahid Afridi said, I want to form two teams for Pakistan  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.