Shreyas Iyer Surgery https । नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final 2023) भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दुरावला आहे. अशातच संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर देखील आगामी आयपीएल (IPL) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलला मुकण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अहमदाबाद कसोटीदरम्यान श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाली होती. आता डॉक्टरांनी त्याला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस सध्या मुंबईत डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तिसऱ्या तपासणीनंतर डॉक्टरांनी श्रेयसला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. म्हणजेच अय्यर जवळपास पाच महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
IPL ला देखील मुकणार
तसेच आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामाला देखील अय्यर गैरहजर असणार आहे. याशिवाय 7 जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्यासाठीही अय्यर उपलब्ध नसेल. त्यामुळे हा भारतीय संघाला मोठा धक्का मानला जात आहे. माहितीनुसार, श्रेयस अय्यरला लंडनमध्ये सर्जरी करायची आहे. पण ऑपरेशनसाठी ठिकाण किंवा हॉस्पिटल अद्याप बीसीसीआयने ठरवलेले नाही. खरं तर इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 12 जून यादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Following Rishabh Pant and Jasprit Bumrah, Shreyas Iyer is also likely to miss the IPL and WTC Final 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.