एडबॅस्टन - इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताला 31 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. इंग्लंड - भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत विजय मिळवून यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडने हजारावा कसोटी सामन्याचा आनंद विजयानेच साजरा केला. या कसोटीचा निकाल चौथ्याच दिवशी लागला. इंग्लंडच्या या विजयानंतर एडबॅस्टन स्टेडियमच्या व्यवस्थापनाने सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी दोन्ही संघांसाठी तयार केलेलं जेवण त्यांनी गरिबांना खाऊ घातलं.
Following @englandcricket’s early win yesterday in Specsavers Test match, staff at Edgbaston made a substantial donation of fresh food to @letsfeedbrum, a great charity that’s supporting the homeless— Edgbaston (@edgbaston) August 5, 2018
एडबॅस्टनच्या वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीचा अपवाद वगळता दोन्ही डावांत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पाच बाद ११० धावांवरून भारताने पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र ५४.५ षटकांतच भारताचा संघ १६२ धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सने चौथ्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला. त्याने ४० धावांत चार बळी घेतले. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. सामना संपल्यानंतर एडबॅस्टन व्यवस्थापनाने दोन्ही संघांसाठी तयार केलेलं जेवण बेघरांसाठी काम करणा-या 'Let's Feed Brum' या संस्थेला दान केले.