Join us  

VIDEO : "मुंबईचा राजा आला रे...", हिरो स्टाईलमध्ये एन्ट्री घेत 'हिटमॅन' मुंबईच्या ताफ्यात सामील

mumbai indians team 2023 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:38 PM

Open in App

rohit sharma ipl 2023 । मुंबई : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-२० लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरूवात ३१ मार्चपासून होत आहे. आगामी हंगामातील पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. 

दरम्यान, सोमवारी संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या ताफ्यात सामील झाला, ज्याचा व्हिडीओ एमआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहित शर्मा २०११ मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग बनला आणि अलीकडेच त्याने फ्रँचायझीसह १२ वर्षे पूर्ण केली. त्याचा मुंबईच्या संघातील प्रवास अप्रतिम राहिला आहे. आयपीएल २०२३ मध्ये रोहित पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 

मुंबईचा राजा आला रे...  आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल. 

IPL २०२३ साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक - 

  1. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  2. ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
  3. ११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  4. १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून 
  5. १८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  6. २२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  7. २५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  8. ३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  9. ३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  10. ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून 
  11. ९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  12. १२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  13. १६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  14. २१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी  ३.३० वा.पासून  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२३रोहित शर्मामुंबईसोशल व्हायरल
Open in App