भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी... या दोन्ही देशांमधील राजकीय तणाव हे सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच क्रिकेटमध्ये मैदानावरील या दोन्ही संघांमधील लढत ही चाहत्यांसाठी पर्वणीच... २०२३ मध्ये आशिया चषक, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत हे उभय संघ एकमेकांना किमान ४ - ५ वेळा भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा उत्साहच आहे. १४ ऑक्टोबरला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत IND vs PAK हा महामुकाबला अहमदाबाद येथे होतोय. त्याआधी Asia Cup 2023 मध्ये २ सप्टेंबला दोन्ही संघ भिडणार आहेत. एवढे कट्टर प्रतिस्पर्धी असूनही टीम इंडियाच्या जर्सीवर 'Pakistan' लिहिलेलं दिसत आहे.
आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत. आशिया चषकाचे सामने दोन देशांत होणार असले तरी यजमानपद हे पाकिस्तानकडेच कायम आहे. त्यामुळे नियमानुसार सहभागी संघांना त्यांच्या जर्सीवर यजमान देशाचं नाव लिहिणे बंधनकारक आहे. त्यामुळेच टीम इंडियाच्या जर्सीवर आशिया चषक २०२३ च्या लोगोसह यजमान पाकिस्तानचे नावही दिसत आहे.
आशिया चषकाचे वेळापत्रक३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल