'परदेशी कोच येतात, पैसे कमवतात अन् गायब होतात'; गौतम गंभीरच्या विधानाची नेटिझन्सकडून 'शाळा'!

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सध्या एका विधानावरून चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:36 PM2022-12-01T12:36:14+5:302022-12-01T12:41:08+5:30

whatsapp join usJoin us
'Foreign Coaches Come Here, Make Money, & Vanish': Gautam Gambhir trolled on social media on his remark | 'परदेशी कोच येतात, पैसे कमवतात अन् गायब होतात'; गौतम गंभीरच्या विधानाची नेटिझन्सकडून 'शाळा'!

'परदेशी कोच येतात, पैसे कमवतात अन् गायब होतात'; गौतम गंभीरच्या विधानाची नेटिझन्सकडून 'शाळा'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सध्या एका विधानावरून चर्चेत आला आहे. मागील आठवड्यात त्याने इंडियन प्रीमिअर लीग हे भारतीय क्रिकेटला मिळालेला वरदान असल्याचे विधान केले होते आणि त्याचवेळी त्याने परदेशी प्रशिक्षक नको, ही ठाम भुमिका घेतली होती. पण, या विधानावर नेटिझन्सही गंभीरची शाळा घेतली आहे.

भारतीय संघ आता बांगलादेश दौऱ्यावर जाणार; विराट, रोहित संघात परतणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलमुळे खेळाडूंना आर्थिक सुरक्षितता मिळाली आणि ग्रासरुट लेव्हलवर अधिक खेळाडू घडविण्यासाठी मदत झाली, असे गंभीर म्हणाला. ''३५-३६ वर्षांचा असेपर्यंतच खेळाडू कमवतो. आयपीएल आर्थिक सुरक्षा प्रदान करते जे तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली एक चांगली गोष्ट म्हणजे भारतीयांनी आता राष्ट्रीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. संघाचे प्रशिक्षक भारतीय असले पाहिजेत असे माझे ठाम मत आहे. हे सर्व परदेशी प्रशिक्षक, ज्यांना आम्ही खूप महत्त्व दिले ते पैसे कमावण्यासाठी इथे येतात आणि मग ते गायब होतात. खेळात भावना महत्त्वाच्या असतात. भारतीय क्रिकेटबद्दल फक्त तेच लोक भावूक होऊ शकतात ज्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे,''असेही गंभीर म्हणाला.

 


 गंभीरचे परदेशी प्रशिक्षकांबद्दलचे मत अनेकांना नाही पटले आणि त्यांनी २०११च्या वर्ल्ड कपची आठवण करून दिली. गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता.  

 

"मी लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. मला एक गोष्ट बदलायची आहे की मला सर्व भारतीय प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये पाहायचे आहे. कारण बिग बॅश किंवा इतर कोणत्याही परदेशी लीगमध्ये कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाला संधी मिळत नाही. भारत क्रिकेटमध्ये महासत्ता आहे, पण आमच्या प्रशिक्षकांना कुठेही संधी मिळत नाही. सर्व परदेशी येथे येतात आणि उच्च नोकर्‍या मिळवतात. आम्ही इतर लीगपेक्षा अधिक लोकशाही आणि लवचिक आहोत. आम्हाला आमच्याच लोकांना अधिक संधी देण्याची गरज आहे," तो पुढे म्हणाला. 
 

Web Title: 'Foreign Coaches Come Here, Make Money, & Vanish': Gautam Gambhir trolled on social media on his remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.