Join us

IPL 2023: कार्यक्रमात Harbhajan Singhच्या बाजूला बसला होता Sreesanth , सेहवागने टिंगल करताच भज्जी म्हणाला...

हरभजनने भरमैदानात श्रीसंतच्या कानाखाली मारली होती, त्यावरून सेहवाग बोलू लागला असताना घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:49 IST

Open in App

Harbhajan Singh S Sreesanth : IPL च्या पहिल्याच हंगामातील मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातला सामना कोणीही विसरू शकणार नाही. पंजाबने हा सामना ६६ धावांनी जिंकला आणि संपूर्ण संघ आनंद साजरा करत होता. याच दरम्यान, टीव्हीवर एक चित्र दिसले, ज्यामध्ये पंजाबचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत रडताना दिसला. सामना संपल्यानंतर समजले की, हरभजन सिंग श्रीशांतला कानशिलात लगावली होती. मीडियाने या प्रकाराला 'स्लॅपगेट' (Slapgate) असे नाव दिले होते. त्यानंतर प्रथमच हरभजन आणि श्रीसंत IPLच्या मंचावर बाजूबाजूला बसलेले दिसले. यावेळी सेहवागने हरभजनची टिंगल करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भज्जीच्या प्रतिक्रियेने चांगलीच वाहवा मिळवली.

कार्यक्रमात काय घडलं?

15 वर्षांपूर्वीच्या या घटनेनंतर कालांतराने हरभजन आणि श्रीशांत यांची मैत्री झाली होती. या दोघांनीही हे उघडपणे सांगितले होते. पण दोन्ही खेळाडू समोरासमोर आले आणि एक किस्सा घडला. 2 एप्रिलला भारताच्या वर्ल्ड कप विजयाला 12 वर्ष झाली. त्यामुळे स्टार स्पोर्ट्सच्या एका विशेष कार्यक्रमात हरभजन सिंग आणि एस श्रीशांत बाजूबाजूला आले. वर्ल्ड कप विजेत्या टीमचे सदस्य वीरेंद्र सेहवाग आणि युसूफ पठाणही उपस्थित होते. या दरम्यान, श्रीसंतने हरभजन सोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला. यानंतर सेहवागने गंमतीत त्याला १५ वर्षे जुनी घटना आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र हरभजन सिंगने त्याला मध्येच रोखलं.

श्रीसंतने हरभजनसोबतच्या मैत्रीबद्दल सांगितले की, तो प्रत्येक सामन्यापूर्वी भज्जीला मिठी मारायचा. ते म्हणाले,

श्रीसंत- कोणतीही कसोटी किंवा इतर कोणताही सामना खेळण्यापूर्वी मी नेहमी भज्जी पा ला मिठी मारत असे. यामुळे माझी कामगिरी नेहमीच चांगली झाली.

सेहवाग (गमतीत)- 'तू हे कधीपासून करायला सुरुवात केलीस? तो गोंधळ झाला त्यानंतरच असेल ना...?

हरभजन सिंग (सेहवागला मध्येच थांबवत)- अरे यार, आता विसरा तो प्रसंग...

गेल्या वर्षी दोघेही आले होते समोरासमोर

मागील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये, हरभजन सिंग आणि श्रीशांत ग्लान्स लाइव्ह फेस्टमध्ये समोरासमोर आले होते. संभाषणादरम्यान, हरभजनने त्या घटनेची आठवण करून दिली आणि सांगितले की ही त्याची सर्वात मोठी चूक होती आणि त्याने ती करायला नको होती. हरभजन म्हणाला होता की, त्या आयपीएल सामन्यात जे काही घडले ते चुकले. मी एक चूक केली. असे कृत्य केल्याची लाज वाटते. जर मला माझी एक चूक दुरुस्त करायची असेल, तर मी श्रीशांतसोबतची चुकीची वागणूक बदलू इच्छितो. जेव्हा मी त्या दिवसाचा विचार करतो तेव्हा मला असे वाटते की हे करण्याची गरज नव्हती.

टॅग्स :आयपीएल २०२३श्रीसंतहरभजन सिंगविरेंद्र सेहवाग
Open in App