Join us  

'वर्ल्ड चॅम्पियन' कर्णधार म्हणतो- "यावर्षी लखनौ IPLची फायनल खेळणारच, कारण..."

ipl 2023 : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 6:43 PM

Open in App

aaron finch ipl 2023 । मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात 31 मार्चपासून होत आहे. या बहुचर्चित स्पर्धेला सुरूवात होण्याआधी सर्व संघ आपल्या संघातील कमकुवत बाबींवर अभ्यास करत आहेत. आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने लखनौ सुपर जायंट्सच्या संघातील कमकुवत बाजूंवर भाष्य केले आहे. 

आरोन फिंचने म्हटले, "मला लखनौ सुपर जायंट्समध्ये काही संभाव्य कमकुवतपणा दिसत आहे, त्यांची डेथ बॉलिंग आहे. मला वाटते की त्यांच्याकडे बरेच पर्याय आहेत, त्यांच्याकडे काही चांगले अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. पण माझ्या मते, जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन बघता तेव्हा चांगल्या दर्जाची डेथ बॉलिंगची चार षटके शोधणे लखनौच्या संघासमोर खरे आव्हान असेल."

लखनौच्या संघातील 4 परदेशी खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या संघात चार परदेशी खेळाडू कोण असतील, असे विचारले असता फिंच म्हणाला, "मला वाटते की लखनौ सुपर जायंट्ससाठी परदेशी 4 खेळाडू ही पहिली पसंती आहे. क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि मार्क वुडचा लखनौने संघात समावेश करावा. कारण वुडचा मोठा प्रभाव पडू शकतो." 

लखनौचा संघ फायनलमध्ये डोकावेल - फिंच तसेच या हंगामात लखनौचा संघ पाचव्या स्थानापर्यंत असू शकतो. याशिवाय फायनलमध्ये देखील डोकावू शकतो, दबावाखाली त्यांच्या डेथ बॉलिंगबद्दल मला थोडी चिंता वाटते. पण एकंदरीत संघात एक मजबूत बाजू आहे, ती म्हणजे लखनौच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत, असे आरोन फिंचने अधिक म्हटले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :लखनौ सुपर जायंट्सअ‍ॅरॉन फिंचआयपीएल २०२३लोकेश राहुल
Open in App