नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा तो रात्रीच्या जेवणासाठी मित्रांसोबतच्या एका नियोजित बैठकीपूर्वी क्रिकेट बघत होता, असे त्याच्या मॅनेजरने म्हटले आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या शनिवारच्या एका वृत्तानुसार, वॉर्नचा बिझनेस मॅनेजर त्याला वाचविण्यासाठी जवळपास 20 मिनिटांपर्यंत सीपीआर करत होता.
वॉर्न मद्यपान करत नव्हता -
संबंधित वृत्तानुसार, '52 वर्षीय माजी क्रिकेटरच्या मॅनेजरने हेराल्ड आणि द एजशी बोलताना सांगितले की, वार्न आपला मित्र अँड्र्यूला भेटण्यापूर्वी (जो वॉर्नसोबत थायलंडला गेला होता आणि रात्रीच्या जेवणापूर्वी हॉटेलमध्ये उपस्थित होता.) मद्यपान करत नव्हता.' तसेच वार्न टीव्हीवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेला ऐतिहासिक पहिला कसोटी सामना बघत होता. याच वेळी तो बेशुद्ध झाला. तो थायलंडमधील के कोह समुई येथे सुट्ट्या एन्जॉय करत होता. तसेच आपल्या कॉमेंटिंग असाइनमेंटसंदर्भात यूके लाही जाणार होता.'
डायटिंग करत होता वॉर्न -
वर्नचा मॅनेजर जेम्सनुसार, वार्नने ड्रिंक्स बंद केले होते. कारण तो डायटिंग करत होता. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन वॉर्नला श्रद्धांजली देताना म्हणाले, 'वार्न काही अशा लोकांपैकी एक होता, जो महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांच्या असामान्य कामगिरीपर्यंत पोहोचू शकत होता. पण ऑस्ट्रेलियन लोकांसाठी शेन याहूनही अधिक होता. शेन आमच्या देशातील सर्वात महान व्यक्तिंपैकी एक होता. ऑस्ट्रेलियन्स त्याचावर प्रचंड प्रेम करत होते.'
Web Title: Former australion cricketer Shane warne was not drinking before his death revealed his manager
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.