पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनंतर आता बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मोर्तझा यानं कोरोना व्हायरसवर मात केली आहे. मंगळवारी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, परंतु त्याची पत्नी सुमोना हक ही अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. मोर्तझाने फेसबुकवरू ही माहिती दिली.
त्यानं लिहिलं की,''माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. या संकटकाळात तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. मात्र, माझी पत्नी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहे. तिची प्रकृती ठिक आहे. तिच्यासाठी प्रार्थना करा. मी घरीच उपचार घेतले. ज्यांना कोरोना झालाय त्यांनी सकारात्मक राहा. अल्लाहवर विश्वास ठेवा आणि नियमांचे पालन करा. आपण सर्व मिळून या व्हायरला हरवू शकतो.''
আসসালামু আলাইকুম। আশা করি সবাই ভালো আছেন।
আলহামদুলিল্লাহ। আল্লাহর রহমতে ও আপনাদের সবার দোয়ায় আমার করোনা ভাইরাস...
Posted by Mashrafe Bin Mortaza on Tuesday, July 14, 2020
20 जूनला मोर्तझा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर घरीच तो क्वारंटाईन झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची पत्नी आणि भाऊ हेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. कोरोना व्हायरसच्या संकटात मोर्तझानं अनेक गरजूंन मदत केली. त्यानं गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम केलं आणि त्याच दरम्यान त्याला कोरोना झाला असावा. बांगलादेशमध्ये कोरोनाचे 2 लाख रुग्ण आहेत. मोर्तझासह सहकारी क्रिकेटपटू नफिस इक्बाल आणि नझमूल इस्लाम यांनाही कोरोना झाला होता आणि त्यांनी त्यावर मात केली.
Good News : ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार
Web Title: Former Bangladesh captain Mashrafe Mortaza recovers from COVID-19 infection, wife still positive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.