Join us  

आफ्रिदीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला झाला कोरोनाचा संसर्ग

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 8:00 PM

Open in App
ठळक मुद्देबांगलादेशचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज मश्रफे मोर्तझा यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहेआफ्रिदीपाठोपाठ कोरोनाचा संसर्ग झालेला मोर्तझा हा दुसरा मोठा क्रिकेटपटू आहेमोर्तझा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. दरम्यान, शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली

ढाका - कोरोना विषाणूच्या संसर्गाने सध्या संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच इतर कठोर नियमांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सध्या बंद आहे. दरम्यान, क्रिकेटपटूंनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

बांगलादेशचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज मश्रफे मोर्तझा यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आफ्रिदीपाठोपाठ कोरोनाचा संसर्ग झालेला मोर्तझा हा दुसरा मोठा क्रिकेटपटू आहे. मोर्तझा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. दरम्यान, शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मोर्तझा सध्या घरीच क्वारेंटिन झाला आहे.  

मोर्तझाला गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता. शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी  करण्यात आली. त्याचे रिपोर्ट आम्हाला आज मिळाले आहेत. मोर्तझाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्याला ढाका येथील घरामध्येच क्वारेंटिन करण्यात आले आहे, कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन मोर्तझाचा छोटा भाऊ मोरसलिन बिन मोर्तझा याने केले आहे.  

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्तझाच्या कुटुंबातील काही व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता.  मोर्तझा हा बांगलादेशमधील संसदेचा सदस्य असून, कोरोनाच्या संसर्गादरम्यान तो मदत अभियान राबवत होता. दरम्यान, मोर्तझासोबतच बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमीम इक्बाल याचा भाऊ नफीस इक्बाल याचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. बांगलादेशमध्ये कोरोना विषाणूने मोठे थैमान घातले असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

 

टॅग्स :बांगलादेशआंतरराष्ट्रीय क्रिकेट