IPL 2024 - इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी भारताचे माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांची धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती जाहीर केली. निवड समितीचे माजी बीसीसीआय अध्यक्ष LSGला मार्गदर्शन प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे फ्रँचायझीने एका निवेदनात म्हटले आहे.
MSK प्रसाद टॅलेंट सर्च आणि टॅलेंट डेव्हलपमेंटचे प्रमुख म्हणून फ्रँचायझीला मदत करतील, असे LSG ने सांगितले. IPL 2024 साठी जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची ही नवीन नियुक्ती ठरली आहे. MSK प्रसाद यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून काम केले. भारताने २०१८-१९ व २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली, तेव्हा प्रसाद निवड समिती प्रमुख होते. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अंबाती रायुडूला वगळून विजय शंकर याची त्यांनी केलेली निवड वादग्रस्त ठरली होती.
MSK प्रसाद यांनी आंध्र क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक म्हणूनही काम केले आहे, जिथे त्यांनी आंध्र प्रदेशातील १३ जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक कोचिंग सुविधांची स्थापना केली. एमएसके प्रसाद यांनी १९९९ ते २००१ दरम्यान भारतासाठी ६ कसोटी आणि १७ वन डे सामने खेळले. त्यांनी एकूण ९६ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि ४००० हून अधिक धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्सची IPL 2024 ची तयारीकर्णधार - लोकेश राहुलमार्गदर्शक - गौतम गंभीरमुख्य प्रशिक्षक - जस्टीन लँगरगोलंदाज प्रशिक्षक- मॉर्ने मॉर्केलक्षेत्ररक्षण प्रशिक्षक - जाँटी ऱ्होड्सधोरणात्मक सल्लागार - एमएसके प्रसाद