ODI World Cup : वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू 

५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 08:46 PM2023-08-25T20:46:47+5:302023-08-25T20:47:14+5:30

whatsapp join usJoin us
former bcci precident Sourav Ganguly snubs Yuzvendra Chahal in his 15-member squad for 2023 World Cup  | ODI World Cup : वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू 

ODI World Cup : वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 | नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आगामी वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी क्रिकेटच्या दादानं १५ सदस्यीय संघ निवडला. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आगामी मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जाणकारांसह माजी क्रिकेटपटू आपापली मतं मांडत आहेत. 

दरम्यान, ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. गांगुलींनी विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात संजू सॅमसन, तिलक वर्मा, युझवेंद्र चहल आणि रवीचंद्रन अश्विनला स्थान मिळालं नाही. 

गांगुलींनी निवडला विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. Rohit Sharma (c), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohammed Shami, and Mohammed Siraj.

विश्वचषकातील भारताचे सामने - 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू 

Web Title: former bcci precident Sourav Ganguly snubs Yuzvendra Chahal in his 15-member squad for 2023 World Cup 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.