नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. काल या स्पर्धेत भारत आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना खेळवला गेला. मात्र भारताचा सामना सुरू असतानाच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुषांइतकेच वेतन मिळणार असल्याचे जय शाह यांनी जाहीर केले. या ऐतिहासिक निर्णयानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी बीसीसीआयचे कौतुक केले. मात्र बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 24 तासांनी बीसीसीआयचे कौतुक केले आहे. तसेच हा निर्णय सर्वप्रथम सकाळी वृत्तपत्रामध्ये वाचला असल्याचेही त्यांनी म्हटले. खरं तर यापूर्वी न्यूझीलंडने तीन महिन्यांपूर्वी समान वेतन त्यांच्या महिला व पुरुष क्रिकेटपटूंसाठी जाहीर केले होते. जय शाह यांनी घोषणा करताच जगभरातील क्रिकेटप्रेमींना त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच भारतीय महिला खेळाडूंनी देखीय या निर्णयावर आनंद व्यक्त केला.
जय शाह यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, भेदभावाचा सामना करण्यासाठी BCCIने पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल."
24 तासांनी मानले BCCI चे आभारजय शाह यांनी गुरूवारी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. मात्र सौरव गांगुली यांनी 24 तास उलटल्यानंतर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "आज सकाळीच वृत्तपत्रामध्ये पाहिलं.. जय, रॉजर, राजीवभाई, आशिषजी, देबोजित आणि सर्व परिषदेच्या सदस्यांचे या निर्णयाबद्दल अभिनंदन. महिला क्रिकेटमध्ये खूप मेहनत घेतली गेली आहे आणि ती त्यांच्या कामगिरीत दिसून येत आहे."
बीसीसीआयची नवी टीम
- अध्यक्ष - रॉजर बिन्नी ( कर्नाटक)
- सचिव - जय शाह ( गुजरात)
- उपाध्यक्ष - राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश)
- खजिनदार - आशिष शेलार ( महाराष्ट्र)
- सर चिटणीस - देवाजित सैकिया ( आसाम)
- आयपीएल चेअरमन - अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)
महिला व पुरूष क्रिकेटपटूंना मिळणार समान वेतनलक्षणीय बाब म्हणजे बीसीसीआयच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महिला खेळाडूंना देखील पुरूष खेळाडूंप्रमाणे मॅच फी दिली जाईल. एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रूपये दिले जातील. समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो. जय हिंद, असेही जय शाह यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"