मागील काही दिवसांपासून श्रेयस अय्यर आणि इशान किशन प्रसिद्धीच्या झोतात आहेत. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. दोन्हीही स्टार खेळाडूंचे बीसीसीआयने वार्षिक करारातून नाव वगळले आहे. अलीकडच्या काळात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी आपापल्या संघांसाठी रणजी ट्रॉफीचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतल्याने ते चर्चेत आले आहेत. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंना आपापल्या राज्यांसाठी रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले होते, परंतु तरीही या दोघांनी देशांतर्गत स्पर्धेत भाग घेतला नाही. नंतर या दोघांना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले.
दरम्यान, श्रेयस अय्यर सध्या तामिळनाडूविरूद्धच्या सामन्यात खेळत असून तो मुंबईच्या संघाचा हिस्सा आहे. तर किशन अद्याप देशांतर्गत क्रिकेटकडे वळला नाही. नुकतेच तो डीवाय पाटील चषकमध्ये दिसला होता. किशन आणि अय्यर यांचा वाद चिघळल्यानंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संघ व्यवस्थापनासह बीसीसीआय सचिव जय शाह यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
किशन-अय्यर वाद प्रकरण!
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय संघ निवडकर्त्यांनी इशान किशनशी बोलले पाहिजे. दिल्ली कॅपिटल्ससाठी निवडलेल्या सर्व खेळाडूंनी भारताच्या तीन प्रमुख देशांतर्गत स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भाग घेतला आहे. इशांत शर्मानेही यावर्षी रणजी ट्रॉफी खेळली आहे. ते 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
तसेच इशान किशनचे हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे आणि बीसीसीआयने आता इशानसोबत चर्चा करायला हवी. दिल्ली कॅपिटल्समध्ये निवडलेल्या सर्व खेळाडूंनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी खेळली आहे. इशांत शर्मानेही रणजी खेळला आहे. कोणीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला विरोध करता कामा नये.
Web Title: Former BCCI president Sourav Ganguly reacts to Ishan Kishan and Shreyas Iyer's contract termination and says that Jay Shah and Rogger Binny should talk to the players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.