Join us  

Ravindra Jadeja vs CSK : कर्णधारपद काढून घेतल्याने नाराज झालाय रवींद्र जडेजा; CSKसोबतच्या वादावर CEOचं महत्त्वाचं विधान 

चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2022) हेही पर्व काही खास जाताना दिसत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 4:56 PM

Open in App

चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2022) हेही पर्व काही खास जाताना दिसत नाही. २०२०मध्ये गुणतालिकेत तळाला राहिल्यानंतर आणि सुरेश रैनासोबतच्या वादानंतर २०२१मध्ये CSK ने विजेतेपद पटकावले. पण, २०२२मध्ये संघावर पुन्हा तळावर राहण्याची नामुष्की ओढावताना दिसतेय आणि यावेळेस प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) सोबतच्या वादाला सुरूवात झालीय. आयपीएल २०२२ला सुरुवात होण्याआधीच महेंद्रसिंग  धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली. २०१२पासून CSK सोबत असलेल्या जडेजाकडे भविष्याचा कर्णधार म्हणून पाहिले गेले. 

पण, ८ सामन्यांत फक्त दोन विजय मिळवणाऱ्या जडेजाला पुन्हा कर्णधारपदावरून हटवले गेले आणि धोनीने पुन्हा सुत्र हाती घेतली. त्यानंतर काही सामने खेळल्यानंतर जडेजाला दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात बाकावर बसवले गेले आणि आता तर त्याने आयपीएलमधूनच माघार घेतली आहे. जडेजाला दुखापत झाली, यात तथ्य असले तरी त्याच्या माघार घेण्यामागे तेच कारण आहे, असे अनेकांना वाटत नाही. ज्या प्रकारे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले गेले, त्यावरून तो नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच त्याने आयपीएलमधून माघार घेतली. Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार जडेजाला फ्रँचायझीचा कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय आवडलेला नाही. संघसहकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

''सुरेश रैना सोबत घडलं, तेच रवींद्र जडेजासोबतही घडणार; अष्टपैलू खेळाडू पुढल्या वर्षी CSKकडून नाही खेळणार''

 

मपण, फ्रँचायझीचे CEO काशी विश्वनाथन यांचे म्हणणे काही वेगळे आहे. जडेजा हा आमच्या संघाचा भाग आहे आणि भविष्यातही तो संघासोबतच असेल. सोशल मीडियावर काय चर्चा सुरूय ते मी पाहत नाही. त्यामुळे मला कल्पना नाही, तिथे काय सुरू आहे. संघ व्यवस्थापकाच्या बाजूने सांगायचे झाले तर, जडेजा व त्यांच्या काहीच वाद नाही. जडेजा भविष्यातही CSKसोबतच असेल, असे विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजामहेंद्रसिंग धोनी
Open in App