World Cup 2023 Qualifier fixtures - दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज आणि १९९६ सालचा विजेता श्रीलंका यांना आगामी आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. १८ जून ते १९ जुलै या कालावधीत झिम्बाब्वे येथे ही पात्रता स्पर्धा होणार आहे. आयसीसीने या पात्रता स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर केले आणि भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या उर्वरित दोन स्थानांसाठी १० संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिजसोबत अ गटात यजमान झिम्बाब्वे, नेदरलँड्स, नेपाळा आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
शे होपच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ ही स्पर्धा खेळणार आहे. श्रीलंकेसोबत ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. सुपर लीगमध्ये श्रीलंकेला १०व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, तर वेस्ट इंडिज ९व्या स्थानावर राहिला होता. सुपर लीगमधील अव्वल ८ संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
असं असेल वेळापत्रक
रविवार, 18 जून
झिम्बाब्वे विरुद्ध नेपाळ, हरारे स्पोर्ट्स क्लब
वेस्ट इंडीज विरुद्ध यूएसए, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
सोमवार, 19 जून
श्रीलंका विरुद्ध UAE, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
आयर्लंड विरुद्ध ओमान, बुलावायो ऍथलेटिक क्लब
मंगळवार, 20 जून
झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड, हरारे स्पोर्ट्स क्लब
नेपाळ विरुद्ध यूएसए, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
बुधवार, 21 जून
आयर्लंड विरुद्ध स्कॉटलंड, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
ओमान विरुद्ध यूएई, बुलावायो ऍथलेटिक क्लब
गुरुवार, 22 जून
वेस्ट इंडीज विरुद्ध नेपाळ, हरारे स्पोर्ट्स क्लब
नेदरलँड्स विरुद्ध यूएसए, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
शुक्रवार, 23 जून
श्रीलंका विरुद्ध ओमान, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
स्कॉटलंड विरुद्ध यूएई, बुलावायो ऍथलेटिक क्लब
शनिवार, 24 जून
झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज, हरारे स्पोर्ट्स क्लब
नेदरलँड विरुद्ध नेपाळ, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
रविवार, 25 जून
श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
स्कॉटलंड विरुद्ध ओमान, बुलावायो ऍथलेटिक क्लब
सोमवार, 26 जून
झिम्बाब्वे विरुद्ध यूएसए, हरारे स्पोर्ट्स क्लब
वेस्ट इंडीज विरुद्ध नेदरलँड, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
मंगळवार, 27 जून
श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
आयर्लंड विरुद्ध यूएई, बुलावायो ऍथलेटिक क्लब
गुरुवार, २९ जून
सुपर ६: A2 v B2, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
शुक्रवार, ३० जून
सुपर ६: A3 v B1, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: A5 v B4, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
शनिवार, 1 जुलै
सुपर 6: A1 v B3, हरारे स्पोर्ट्स क्लब
रविवार, 2 जुलै
सुपर 6: A2 v B1, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: A4 v B5, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
सोमवार, ३ जुलै
सुपर ६: A3 v B2, हरारे स्पोर्ट्स क्लब
मंगळवार, 4 जुलै
सुपर 6: A2 विरुद्ध B3, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: 7 वी विरुद्ध 8 वी ताकाशिंगा क्रिकेट क्लब
बुधवार, ५ जुलै
सुपर सिक्स: A1 v B2, हरारे स्पोर्ट्स क्लब
गुरुवार, ६ जुलै
सुपर सिक्स: A3 विरुद्ध B3, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
प्लेऑफ: 9वा विरुद्ध 10वा ताकाशिंगा क्रिकेट क्लब
शुक्रवार, 07 जुलै
सुपर सिक्स: A1 विरुद्ध B1, हरारे स्पोर्ट्स क्लब
रविवार, 09 जुलै
फायनल, हरारे स्पोर्ट्स क्लब
Web Title: Former champions West Indies and Sri Lanka have been drawn in opposing groups as World Cup Qualifier fixtures are released
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.