World Cup 2023 Qualifier fixtures - दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज आणि १९९६ सालचा विजेता श्रीलंका यांना आगामी आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. १८ जून ते १९ जुलै या कालावधीत झिम्बाब्वे येथे ही पात्रता स्पर्धा होणार आहे. आयसीसीने या पात्रता स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर केले आणि भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या उर्वरित दोन स्थानांसाठी १० संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिजसोबत अ गटात यजमान झिम्बाब्वे, नेदरलँड्स, नेपाळा आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
शे होपच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ ही स्पर्धा खेळणार आहे. श्रीलंकेसोबत ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. सुपर लीगमध्ये श्रीलंकेला १०व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, तर वेस्ट इंडिज ९व्या स्थानावर राहिला होता. सुपर लीगमधील अव्वल ८ संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
असं असेल वेळापत्रक रविवार, 18 जूनझिम्बाब्वे विरुद्ध नेपाळ, हरारे स्पोर्ट्स क्लबवेस्ट इंडीज विरुद्ध यूएसए, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
सोमवार, 19 जूनश्रीलंका विरुद्ध UAE, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबआयर्लंड विरुद्ध ओमान, बुलावायो ऍथलेटिक क्लब
मंगळवार, 20 जूनझिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड, हरारे स्पोर्ट्स क्लबनेपाळ विरुद्ध यूएसए, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
बुधवार, 21 जूनआयर्लंड विरुद्ध स्कॉटलंड, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबओमान विरुद्ध यूएई, बुलावायो ऍथलेटिक क्लब
गुरुवार, 22 जूनवेस्ट इंडीज विरुद्ध नेपाळ, हरारे स्पोर्ट्स क्लबनेदरलँड्स विरुद्ध यूएसए, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
शुक्रवार, 23 जूनश्रीलंका विरुद्ध ओमान, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबस्कॉटलंड विरुद्ध यूएई, बुलावायो ऍथलेटिक क्लब
शनिवार, 24 जूनझिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज, हरारे स्पोर्ट्स क्लबनेदरलँड विरुद्ध नेपाळ, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
रविवार, 25 जूनश्रीलंका विरुद्ध आयर्लंड, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबस्कॉटलंड विरुद्ध ओमान, बुलावायो ऍथलेटिक क्लब
सोमवार, 26 जूनझिम्बाब्वे विरुद्ध यूएसए, हरारे स्पोर्ट्स क्लबवेस्ट इंडीज विरुद्ध नेदरलँड, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
मंगळवार, 27 जूनश्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबआयर्लंड विरुद्ध यूएई, बुलावायो ऍथलेटिक क्लब
गुरुवार, २९ जूनसुपर ६: A2 v B2, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
शुक्रवार, ३० जूनसुपर ६: A3 v B1, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबप्लेऑफ: A5 v B4, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
शनिवार, 1 जुलैसुपर 6: A1 v B3, हरारे स्पोर्ट्स क्लब
रविवार, 2 जुलैसुपर 6: A2 v B1, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबप्लेऑफ: A4 v B5, ताकाशिंगा क्रिकेट क्लब
सोमवार, ३ जुलैसुपर ६: A3 v B2, हरारे स्पोर्ट्स क्लब
मंगळवार, 4 जुलैसुपर 6: A2 विरुद्ध B3, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबप्लेऑफ: 7 वी विरुद्ध 8 वी ताकाशिंगा क्रिकेट क्लब
बुधवार, ५ जुलैसुपर सिक्स: A1 v B2, हरारे स्पोर्ट्स क्लब
गुरुवार, ६ जुलैसुपर सिक्स: A3 विरुद्ध B3, क्वीन्स स्पोर्ट्स क्लबप्लेऑफ: 9वा विरुद्ध 10वा ताकाशिंगा क्रिकेट क्लब
शुक्रवार, 07 जुलैसुपर सिक्स: A1 विरुद्ध B1, हरारे स्पोर्ट्स क्लब
रविवार, 09 जुलैफायनल, हरारे स्पोर्ट्स क्लब