Join us  

पिता-पुत्राकडून आकाश चोप्राची ३३ लाखांची फसवणूक; माजी भारतीय खेळाडूनं FIR दाखल केला

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान समालोचक आकाश चोप्रा एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 8:05 PM

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान समालोचक आकाश चोप्रा एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आला आहे. खरं तर शूज व्यावसायिकाने फसवणूक केल्याप्रकरणी आकाशने एफआयआर दाखल केला आहे. बूट व्यावसायिक कमलेश पारीख आणि त्यांचा मुलगा ध्रुव पारीख यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्पोर्ट्स शूजच्या व्यवसायात गुंतवणूक करताना पारिख यांनी आपली फसवणूक केल्याचा चोप्राचा दावा आहे. तक्रारीनुसार, ध्रुवने चोप्राकडून ५७.८ लाख रुपये घेतले होते, मात्र केवळ २४.५ लाख रुपये परत केले. 

दरम्यान, पारीख यांच्याविरुद्धची ही पहिली तक्रार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटर दीपक चहरच्या वडिलांनीही अशीच केस दाखल केली होती. सध्या आकाश चोप्राच्या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी आकाश चोप्राच्या तक्रारीवरून शूज व्यावसायिक कमलेश पारीख आणि त्यांचा मुलगा ध्रुव पारीख यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ४०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

आकाश चोप्राची पोलिसांत धावकमेलश यांनी यापूर्वी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये व्यवस्थापक म्हणून कारभार सांभाळला आहे. स्पोर्ट्स शूजच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पारीखने आपली फसवणूक केल्याचा दावा चोप्राने केला आहे. पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ध्रुव पारीखने त्याच्या स्पोर्ट्स शूजच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आकाश चोप्राकडून ५७.८ लाख रुपये घेतले होते. यासाठी एक लिखित करार  देखील करण्यात आला होता, ज्यामध्ये ध्रुवला २०% नफ्यासह ३० दिवसांच्या आत पैसे परत करावे लागतील असा उल्लेख होता. मात्र, वर्षभरानंतर केवळ २४.५ लाख रुपयेच परत केल्याने आकाश चोप्राने पोलिसांत धाव घेतली. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपोलिस