टीम इंडियाच्या T20 विश्वचषकातील पराभवानंतर आता कर्णधार रोहित शर्मावर आरोप सुरू झाले आहेत. आता रोहितला कर्णधार पदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. आता टीमच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी ही मागणी केली आहे, त्यांनी हार्दिक पांड्याला कर्णधार पदासाठी पाठिंबा दिला आहे.
संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआय प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची भेट घेणार आहेत. हार्दिकला भारताचा पूर्णवेळ T20 कर्णधार बनण्याची शक्यता आहे. हार्दिकचे पहिले काम न्यूझीलंडमध्ये हंगामी कर्णधार म्हणून असेल.
"मी जर आता निवड समितीचा अध्यक्ष असतो तर मी हार्दिक पांड्याला 2024 च्या विश्वचषकासाठी कर्णधार असावा यासाठी पाठिंबा दिला असता. न्यूझीलंड मालिकेतीसाठी आजपासून तयारी सुरू करायला हवी. तयारी 2 वर्षे अगोदर करावी लागते, असंही कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले.
रोहित शर्मा T20 कर्णधारपद सोडणार?
रोहित शर्मा 2023 मध्ये खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडेल अशी शक्यता आहे, तो 2023 आणि 2024 पर्यंत एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कर्णधारपद हार्दिक पांड्याला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
टीम इंडियाने T20 विश्वचषकात सुरूवातील चांगली कामगिरी केली, पण सेमीफायनला इंग्लंड विरुद्धच्या सामना गमवला, त्यामुळे T20 विश्वचषक टीम इंडियाने थोडक्यात गमावला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मावर टीका होत आहेत.