ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत. भारतीय संघाला यूएई नंतर ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप स्पर्धेत अपयश आले. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजयाची नोंद केली होती.
बीसीसीआयने निवड समितीची हकालपट्टी केल्यानंतर आता नवीन अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनूसार, भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटर अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अजित आगरकर यांनी याआधीही या पदासाठी अर्ज केला होता, मात्र गेल्या वेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. परंतु यंदा अजित आगरकर निवड समितीचे अध्यक्ष होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संघ निवड करताना अनेक चुकीचे निर्णय घेतले गेला. आता नव्याने सुरुवात करायची आहे. निवड समितीतील काही सदस्यांचा कार्यकाळ संपायला आला आहे आणि नवीन सुरुवात करण्याचा आमचा विचार आहे. आम्हाल जे निकाल अपेक्षित होते ते मिळालेले नाही आणि जय शाह हे मेलबर्नवरून परतल्यानंतर आम्ही नवीन निवड समिती नेमण्याचा निर्णय घेतला,असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने Inside Sport ला सांगितले.
अजित आगरकर यांची कारकीर्द-
- २६ कसोटी, ५८ विकेट्स
- १९१ वनडे, २८८ विकेट्स
- ४ ट्वेंटी-२०, ३ विकेट्स
- ३२ आयपीएल सामने, २९ विकेट्स
मुख्य निवडकर्ता होण्यासाठी अटी कोणत्या?-
- ७ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेला उमेदवार असावा.
- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३० सामने खेळलेले असावेत.
- १० एकदिवसीय सामने किंवा २० लिस्ट-ए सामने खेळलेले असावेत.
- ५ वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी.
- बीसीसीआयच्या कोणत्याही समितीचा सदस्य नसावा आणि पुढील ५ वर्षे हे पद सांभाळू शकेल.
Web Title: Former cricketer of the Indian Association Ajit Agarkar is the frontrunner to be the chairman of the selection committee.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.