Join us  

टीम इंडियाच्या खेळाडूची शेजाऱ्याला मारहाण, 7 वर्षांच्या मुलालाही केलं जखमी

2008मध्ये त्यानं मेरठ येथे डॉक्टराला मारहाण केली होती. तीन वर्षानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात तो प्रेक्षकाशी भांडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 2:45 PM

Open in App

भारताचा माजी गोलंदाज प्रविण कुमार यानं शेजारी दीपक शर्मा आणि त्याच्या सात वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत दीपक आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. पण, क्रिकेटपटू असल्यामुळे पोलिसही याबाबत तक्रार नोंदवून घेत नसल्याचा दावा दीपकनं केला आहे.

ANIला दीपकनं सांगितलं की,''मी सायंकाळी 3 वाजता माझ्या मुलाच्या शाळेच्या बसची वाट पाहत होतो. तेव्हा प्रविण तेथे त्याची गाडी घेऊन आला आणि त्यानं बस ड्राईव्हरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो माझ्यासोबतही भांडला. त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. त्यानंतर त्यानं मला मारहाण केली आणि त्यामुळे माझा हात फ्रॅक्चर झाला. माझ्या मुलालाही त्यानं ढकललं आणि त्यामुळे त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे. पोलीस तक्रार नोंदवत नाही.''

''आता मला जीवे मारण्याची धमकीही मिळत आहे,'' असा दावा दीपकने केला. ''दीपक आणि प्रविण हे शेजारी आहेत आणि त्यांनी ही घटना पोलिसांना सांगितली. त्यांच्या जबाबावरून आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. वैद्यकीय तपासही पूर्ण झाला आहे,'' असे पोलीस अधिक्षक ( शहर) अखिलेश नारायण यांनी सांगितले.

यापूर्वीही चुकीच्या कारणानं प्रविण कुमार चर्चेत आला होता. 2008मध्ये त्यानं मेरठ येथे डॉक्टराला मारहाण केली होती. तीन वर्षानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात तो प्रेक्षकाशी भांडला होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघगुन्हेगारी