मुंबई : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या आर्थिक टंचाईचा सामना करत आहे. या आधी तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवृत्तिवेतनावर आपले घर चालवत असे. मात्र आता त्याच्यावर आर्थिक मदत मागण्याची नामुष्की ओढावली आहे. विनोद कांबळी याच्याबाबत माहिती कळताच एका मराठी उद्योजकाने त्याला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. विनोद कांबळीला उद्योजक संदीप थोरात (Businessmen Sandeep Thorat) यांनी 1 लाख महिना पगाराची नोकरी ऑफर (Job Offer) केली होती.
विशेष म्हणजे, या ऑफरनंतर बरेच दिवस विनोद कांबळीने ही नोकरी स्विकारली की नाही, याबाबत माहिती समोर आली नव्हती. पण, आता सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला थेट त्याच्या घरी जावून ऑफर लेटर दिले. त्यानंतर विनोद कांबळीने संदीप थोरात यांची नोकरीची ऑफर आपण स्विकारली असल्याचे सांगितले. आता विनोद कांबळी सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक म्हणून काम पाहणार आहे. दरम्यान, उद्योजक संदीप थोरात हे मूळचे अहमदनगरचे आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची घरची परिस्थिती बेताचीच होती. मात्र विनोद कांबळीने जिद्दीने क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवत भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला होता. कोरोना काळानंतर त्याच्या हातात काम नव्हते. एका मुलाखतीत विनोद कांबळीने सांगितले होते की, तो मुश्किलीने आपले कुटुंब चावलत आहे. मला नोकरीची गरज आहे. विनोद कांबळीने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नोकरीची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून अद्याप तरी कोणता प्रतिसाद आलेला नाही.
विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द
विनोद कांबळीने आपल्या कारकीर्दीची सुरुवात शालेय वयापासून केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याने हॅरिस शिल्डमध्ये केलेला 664 धावांच्या भागीदारीचा विक्रम आजही अबाधित आहे. विनोद कांबळीने भारताकडून 17 कसोटी आणि 104 वन डे सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली विनोद कांबळीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Web Title: former cricketer vinod kambli accept businessmen sandeep thorat job offer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.